शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या ५० टक्के पेरणी क्षेत्रात सोयाबीन

By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख १५ हजार क्षेत्रात पेरणी होणार आहे. यासाठी एक लाख २७ हजार क्विंटल ...

सात लाखांवर क्षेत्र : सोयाबीनसाठी १ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरजअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख १५ हजार क्षेत्रात पेरणी होणार आहे. यासाठी एक लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. सर्वाधिक ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन असल्याने पेरणीसाठी एक लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. कृषी विभागाद्वारा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या हंगामात पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. खरिपासाठी संकरित कापूस ३ हजार ५९१ क्विंटल, सुधारित कापूस ६० क्विंटल, तूर ४ हजार ७७६ क्विंटल, मूग एक हजार २६० क्विंटल, संकरित ज्वार २ हजार क्विंटल, उडीद २४४ क्विंटल असे एकूण १ लाख २६ हजार ६८१ क्विंटल बियाणे लागणार आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १२ हजार १४२ क्विंटल, भातकुली १० हजार ७१४ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १५ हजार ६५८ क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकऱ्यांना जागरूक करण्याची गरजखरीप हंगामात सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याला लिक्विड किंवा पावडर स्वरुपातील ‘रायझोबियम अधिक पीएसबी अधिक ट्रायकोडर्मा’ या जिवाणू खतांची व जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे फायदेशीर आहे. तसेच बियाणे प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरसे प्रबोधन व जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाने निवेदनातून कळविले आहे. कृषी साहित्य विक्रेता संघाची प्रतिक्रिया सोयाबीन बियाणे उगवणशक्तीबाबत अत्यंत संवेदनशील आहे. साठवणुकीच्या गोदामातील मे-जून मधील अधिक तापमान, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओलावा, पेरणीची खोली, पेरणीनंतर पावसाचा ताण किंवा बियाणे दडवणारा जोराचा पाऊस याचा सोयाबीनच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणित बियाणे उपरोल्लेखीत घटक अनुकूल नसल्यास उगवले नाही तर जबाबदार कोण? त्यामुळे बियाणे गुणनियंत्रण विभागाने शेतकऱ्यांमध्ये यासंबंधी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे कृषी साहित्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष विलास इंगोले यांनी कळविले आहे.