- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:43+5:30

वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले.

- So let's take Jalasamadhi in Bagaji Sagar Dam | - तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

googlenewsNext
ठळक मुद्देसात वर्षांपासून शेतात पाणी : टेकडीवर बांधला पूल, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : निम्नवर्धा प्रकल्प कार्यालयाने चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे सात वर्षांपासून शेतात पाणी साचत असल्याने वरूड बगाजी येथील शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. दरवर्षी येथील शेतकरी आशेने पेरणी करतात. मात्र पाण्यामुळे उगविलेले पीक सडते. बांधलेल्या पुलावर आजपर्यंत अनेक वेळा खर्च करून बिल काढण्यात आले. मात्र पुलाची अवस्था अद्यापही जैसे थे आहे. याच भागात काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे अन्य शेतीचे नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. मात्र निम्नवर्धा प्रकल्पाने आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांनी बगाजी सागर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा ओंकार काष्टे, चंद्रशेखर भनारकर, नामदेव काष्टे, एकनाथ काष्टे, रामाजी पचाकरे, रामदास पचारे, अरविंद धोटे, कैलाश मोहनकर, सदाशिव पचारे, विनोद झोपाटे, उमेश म्हात्रे यांनी दिला.

शेतकरी देशोधडीला
उताराला न बांधता, टेकड्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पाणी शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतीचा मोठा भाग हा दरवर्षी नापेर राहतो. शेतकऱ्यांना या भागात उत्पादन तर घेता येत नाहीच, जागा कायमस्वरूपी बाधित होण्याची चिन्हे आहेत. शेतकºयांना प्रकल्प प्रशासन देशोधडीला लावत असल्याचा आरोप होत आहे.

निम्न वर्धा प्रकल्प प्रशासनाने टेकडीच्या ठिकाणी पूल बांधला. त्यामुळे माझ्यासह १० शेतकऱ्यांच्या २५-३० एकरांत सात वर्षांपासून पाणी साचत आहे. समस्येवर सात दिवसांत तोडगा काढला नाही, तर आम्ही बगाजी सागर धरणातच जलसमाधी घेऊ.
- ओंकार काष्टे, शेतकरी, वरूड

या भागातील पुलाची निर्मिती सात वर्षांपूर्वी झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर दुसरा रस्ता काढून देण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- रवींद्र वऱ्हाडे, कार्यकारी अभियंता
निम्न वर्धा प्रकल्प, वर्धा

Web Title: - So let's take Jalasamadhi in Bagaji Sagar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.