शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-स्विपिंग रिक्षा’द्वारे आता शहराची ‘स्मार्ट’ सफाई

By admin | Updated: December 16, 2015 00:06 IST

शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना आता सफाईसाठी ‘ई स्विपिंग रिक्षा’चा वापर केला जाणार आहे.

महापौर, आयुक्तांकडून पाहणी : बॅटरीवर चालणार, पुणे येथील कंपनीने सादर केले प्रात्यक्षिकअमरावती : शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना आता सफाईसाठी ‘ई स्विपिंग रिक्षा’चा वापर केला जाणार आहे. ही रिक्षा स्प्रेपंप, स्वच्छतागृहाची साफसफाई, साचलेले पाणी काढणे, वृक्षांना पाणी देणे, घाण साफ करणे अशा विविध कामांसाठी उपयोगी पडणार आहे. मंगळवारी या रिक्षाची महापौर, आयुक्तांनी पाहणी करून प्रथमदर्शी होकार दर्शविला आहे.पुणे येथील एका कंपनीने ‘मॅक्सी क्लिन ई कार्ट’ या नावाने ‘ई-स्विपिंग रिक्षा’ तयार केली आहे. या रिक्षाचे प्रात्यक्षिक मंगळवारी पार पडले. यावेळी महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, नगरसेवक दिनेश बूब, दिगंबर डहाके, नगरसेविका नीलिमा काळे, माजी नगरसेवक लकी नंदा आदींनी या रिक्षाची पाहणी केली. या रिक्षाला इंधनाचा कोणताही खर्च लागणार नाही. ही रिक्षा बॅटीरवर चालणार आहे. विद्युत अथवा सायकलद्वारे रिक्षाची बॅटरी चार्ज करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या रिक्षाची निर्मिती मल्टिपर्पज वापराच्या अनुषंगाने करण्यात आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती वापरायोग्य राहील, असा विश्वास आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केला आहे. ही ‘ई-रिक्षा’ प्रदूषण विरहित असून ती गल्लीबोळातही सहजतेने ने-आण करता येणार आहे. या रिक्षेचे प्रात्यक्षिक केदार पाठक, अविनाश निमिनकर, महेश खोपाडे, प्रसाद जोशी यांनी सादर केले. ‘ई-रिक्षे’बाबत औत्सुक्य आहे. (प्रतिनिधी)‘स्मार्ट सिटी’साठी पूरक उपक्रम स्मार्ट सिटी उपक्रमात ई-स्विपिंग रिक्षा पूरक ठरतील. या रिक्षाला हाताळताना फारसे मनुष्यबळ लागणार नाही. शहराची सद्यस्थिती बघता स्वच्छतेसाठी ही रिक्षा लाभदायक ठरेल, अशी आशा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छतेसाठी नवनवीन उपक्रमांच्या अनुषंगाने ही रिक्षा खरेदी केल्यास इंधनाची बचत होऊन खर्चात कपात होईल, असेही आयुक्त गुडेवार यांनी यावेळी सांगितले. हा विषय स्थायी समितीपुढे मांडला जाणार आहे.