शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘कुलगुरू हटाव’चे नारे

By admin | Updated: March 14, 2015 00:34 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या मूल्यांकन विभागात पुन्हा गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. आंभियांत्रिकी व अन्य विद्याशाखेतील ११ विद्यार्थ्यांनी पैसे देऊन गुणवाढ करून घेतल्याचे सिध्द झाल्यानंतर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. बडनेऱ्यातील युवासेनाध्यक्ष राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख ललित झंझाळ, प्रवीण दिघाते, शैलेशसिंग चव्हाण, विजय खंडारे, रवी सोनटक्के, निलेशसिंग चव्हाण, अजय सूर्यवंशी, गोलू वानखडे, शक्ती भिसे, आशिष तिडके, अमोल अवघड, पवन लेंडे आदींनी कुलगुरू खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी धडक दिली. गुणवाढ प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी यावेळी रेटून धरली होती. यावेळी कुलगुरूंसह परीक्षा नियंत्रक जे. डी. वडते, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, बीसीओडीचे संचालक अजय देशमुख उपस्थित होते. शिवसैनिकांनी सर्वच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत गुणवाढ प्रकरणाचा जाब विचारला. यापूर्वीही अमरावती विद्यापीठात गुणवाढीचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र, दोषींवर कारवाई करण्यात मात्र हयगय केली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. मूल्यांकन अधिकारी मुखर्जी यांना आमच्यासमोर हजर करा, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी कायद्याच्या चाकोरीतूनच कामे केली जात असल्याचे शिवसैनिकांना सांगितले. या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली. शिवसैनिकांनी कुलगुरूंच्या दालनात ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणा देत ‘कुलगुरू हटाव’ची मागणी केली. गुणवाढ प्रकरण असेच सुरु ठेवायचे असेल तर, विद्यार्थ्यांसाठी तसा विशेष कक्ष स्थापन करण्याचा उपहासात्मक सल्लाही शिवसैनिकांनी यावेळी कुलगुरूंना दिला. तब्बल अर्धा तास कुलगुरूंच्या दालनात हा गोंधळ सुरू होता. (प्रतिनिधी)मूल्यांकनात ३५ हजारात गुणवाढएक महिन्यापूर्वी अमरावती विद्यापीठातील पुनर्मूंल्याकंन विभागातील गुणवाढ प्रकरण उघडकीस आले होते. ती चौकशी फे्रजरपुरा पोलीस करीत आहे. हे प्रकरण शांत होत नाही, तो दुसरे गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. अंभियात्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या नियमित मूल्यांकनानंतर उत्तर पत्रिकेंमध्ये खोडतोड करुन गुणवाढ केली. या प्रकरणात अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये देवून गुणवाढ केल्याची माहिती परिक्षा नियंत्रक जे. डी. वडते यांनी दिली.