शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या सभापती पदासाठी स्वाक्षरी मोहीम

By admin | Updated: January 17, 2016 00:13 IST

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस पक्षातील मुस्लीम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली.

अमरावती : महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस पक्षातील मुस्लीम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. सभापतिपद हे मुस्लिम नगरसेवकाला मिळावे, यासाठी माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्यावर दबावतंत्राची राजकीय खेळी चालविल्याचे चित्र आहे.या सत्रातील स्थायी समिती सभापतिपद हे शेवटचे राहणार आहे. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी फ्रंट यांच्यात मैत्री असून सभापतीपद हे सहजतेने काबीज करता येणार आहे. मात्र स्थायी समितीत सदस्यपदाची नियुक्ती होण्यापीर्वीच सभापती पदासाठी लॉबिंग सुरू आहे. काँग्रेस गटातच स्थायीचे सभापतीपद मिळावे, यासाठी मुस्लिम नगरसेवकांनी माहोल तयार करण्यास प्रारंभ केला आहे. महापालिकेत मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी फ्रंट या गटाशी जुळलेले आहे. काँग्रेसने सलग दोन वेळा सुगनंचद गुप्ता, विलास इंगाले यांच्या रुपात सभापतीपद मिळविले आहे. सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला तर यावे, पण ते ही मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला मिळावे, यासाठी काही दिवसांपूर्वी माजी आ.रावसाहेब शेखावत यांची मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुस्लिम समाजाच्या एकुणच नगरसेवकांनी माजी आ. रावसाहेब शेखावत यांच्या पुढ्यात भविष्याचे राजकारण विशद केले. स्थायी समितीचे सभापतीपद हे मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला देणे कसे योग्य राहील, हे उदाहरणानिशी पटवून सांगितले. मात्र सभापतीपद कोणाला द्यावे? हे मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी आपसात ठरवून ते नाव निश्चित करण्याचा मध्यम मार्ग रावसाहेब शेखावत यांनी काढला. त्यानुसार महापालिकेत सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. काँग्रेसमधून आसीफ तवक्कल हे नाव स्थायी समिती सभापती पदासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांच्या दालनात बैठकांचे सत्रदेखील सुरू झाले आहे. मात्र सभापती पदासाठी राष्ट्रवादी फ्रंट गटाला विश्वासात घेतल्याशिवाय काँग्रेसला ते मिळविणे शक्य नसल्याचे बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)