शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे उघडायला हवीत काय? कुणी म्हणतो उघडा, कुणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

असाईनमेंट पान ४ अमरावती: राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने नुकतेच घंटानाद आंदोलन केले. त्यावर मंदिरांची टाळी उघडायला हवीत,पण राजकीय ...

असाईनमेंट

पान ४

अमरावती: राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने नुकतेच घंटानाद आंदोलन केले. त्यावर मंदिरांची टाळी उघडायला हवीत,पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे! अशी प्रतिक्रिया देखील आली.

राज्यात असलेल्या कोरोनाच्या संकटात मंदिरे खुले करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. यासाठी राज्यात भाजपने घंटानाद आंदोलन केले. पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय ? असा सवाल सत्तेतील नेतेमंडळी करीत आहेत. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधक आमनसामने आले आहेत. राज्यभर मंदिर उघडण्याबाबत वातावरण तापत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका जास्त असल्याने मंदिर उघडणे अवघड असल्याची राज्यसरकारची भूमिका आहे.

//////////

सरकार नास्तिक नाही. मात्र, देवाची आराधना करताना बंधन घालणे शक्य नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता रिस्क घेणे परवडणारे नाही. राज्यसरकार केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करीत आहे.

सुनिल खराटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

/////////////

राज्यातील मंदिरे उघडावीत, राज्यातील जनता जनार्दनाचा अधिक अंत पाहू नये, अशी आमची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी आम्ही नुकतेच घंटानाद आंदोलन देखील केले. आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.

तुषार भारतीय, पक्षनेता, भाजप

////////////

तिसरी लाट थोपविण्यासाठी राज्यसरकारने कोरोना नियमावलीचे कटाक्षाने पालन करावे, नियमांची अंमलबजावणी करावी, असे केंद्रसरकारचेच निर्देश आहेत. तर, इकडे राज्यात भाजप मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करते. भाजपची ती भूमिका दुटप्पी आहे.

राजेंद्र महल्ले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉॅंग्रेस

/////////////

मंदिरे उघडावीत, अशी आमची मनीची इच्छा आहे. हजारो, लाखो लोक अंबाबाईच्या दर्शनाला आसुसलेले आहेत. सरकारने मंदिरे तातडीने उघडावीत. आम्ही योग्य ती सुरक्षा पुरवू. काळजी देखील घेऊ.

रवींद्र कर्वे, सचिव, अंबादेवी संस्थान

/////////////

मंदिरे सुरू झालीच पाहिजे देवस्थानचे मेन्टेनन्स करावेच लागते त्यावरचा खर्च कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे शासनाने मदत केली पाहिजे, दर्शना अभावी भक्तांचा देखील हिरमोड होत आहे.

महादेवराव चकुले

अध्यक्ष, श्रीक्षेत्र कोंडेश्वर, देवस्थान