शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मिनिमंत्रालयात पीआरसीची धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:01 IST

पीआरसी समितीत आमदारांसह विधानसभा व विधान परिषदेच्या सचिवांचाही समावेश आहे. पीआरसी समितीचा जिल्हा दौरा निश्चित होताच. समिती भेटी दरम्यान सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल व सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण होणार आहे. यासाठी समितीस पाठविलेली माहिती पुस्तिकेत संबंधित प्रश्न, लेखा आक्षेपात ज्या शासन निर्णय, परिपत्रके आदी माहिती तयार ठेवण्याबाबत झेडपी प्रशासनाला कळविल्यामुळे झेडपी यंत्रणा कामाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीचा दौरा १३ सप्टेंबर रोजी मिनिमंत्रालयात धडकला. आगामी ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान २५ सदस्यीय आमदारांची ही समिती झेडपीत दाखल होणार आहे. या दौऱ्यामुळे झेडपीची यंत्रणा खडबडून जागी होत कामाला लागली आहे.पीआरसी समितीत आमदारांसह विधानसभा व विधान परिषदेच्या सचिवांचाही समावेश आहे. पीआरसी समितीचा जिल्हा दौरा निश्चित होताच. समिती भेटी दरम्यान सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल व सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण होणार आहे. यासाठी समितीस पाठविलेली माहिती पुस्तिकेत संबंधित प्रश्न, लेखा आक्षेपात ज्या शासन निर्णय, परिपत्रके आदी माहिती तयार ठेवण्याबाबत झेडपी प्रशासनाला कळविल्यामुळे झेडपी यंत्रणा कामाला लागली आहे.

असा आहे पीआरसी दौरा- ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत जिल्ह्यातील विधानमंडळ सदस्यांशी औपचारिक चर्चा, ११ ते ११.३० दरम्यान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा, ११.३० वाजता २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील अमरावती जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदातील मुख्यकार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.- ७ ऑक्टोबरला १० वाजेपासून पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि. प. शाळा व ग्रामपंचायतींना भेटी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची प्रश्नावली क्रमाक २ च्या संदर्भात साक्ष, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पासून जि.प.च्या सन २०१७-१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे.

सीईओंनी घेतली बैठकपंचायत राज समिती दौरा धडकताच जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने १४ सप्टेंबर रोजी आपल्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समितीने पाठविलेल्या पत्रानुसार सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८च्या वार्षिक प्रशासन अहवालांचे परीक्षण केले जाणार आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद