शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या ‘परी’साठी ती जिंकली शर्यत

By admin | Updated: March 31, 2017 00:14 IST

दारिद्र्यातून मार्ग काढत घेतलेले शिक्षण. विवाहानंतर सर्व ठीक होईल, असा आशावाद; तथापि मुलीच्या जन्मानंतर अचानक पतीने केलेला त्याग.

एका आईची कहाणी : मुलीच्या जन्मामुळे पतीने ठरविले गुन्हेगार मोहन राऊत धामणगाव रेल्वेदारिद्र्यातून मार्ग काढत घेतलेले शिक्षण. विवाहानंतर सर्व ठीक होईल, असा आशावाद; तथापि मुलीच्या जन्मानंतर अचानक पतीने केलेला त्याग. तरीही केवळ जिद्द अन् उमेदीच्या बळावर विपरीत परिस्थितीवर मात करणाऱ्या एका मातेचा दुर्दम्य आत्मविश्वास विजयी झाल्याचा अविस्मरणीय क्षण धामणगाववासीयांनी प्रीती कुंभरे हिच्या रुपाने नुकताच अनुभवला. अमरावती येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये सव्वा वर्षाच्या मुलीसह आलेल्या प्रीती कुंभरे हिने मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करून शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकली. एकीकडे ध्येयासाठी जीव तोडून धावणे, तर दुसरीकडे चिमुकलीच्या रडण्याने हेलकावणारे मन, असा भावविव्हळ प्रसंग पोलीस बांधव व स्पर्धकांनी गत शनिवारी अनुभवला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथील २४ वर्षीय प्रीती पांडुरंग कुंभरे या आदिवासी महिलेची ही कहाणी आहे़ पॉलिटेक्निकमधून दूध डेअरीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास तिने बाळगला होता. मात्र, प्रीतीचा विवाह २०१४ साली कारंजा येथील युवकाशी झाला. लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या प्रितीला मुलगी झाली. यामुळे पत्नी व मुलीकडे पतीने पाठ फिरविली. सव्वा वर्षापासून पतीने एकदाही मुलीचा चेहरा पाहिला नाही़ प्रितीने मात्र मुलीचे नाव परी ठेवले. ती आपल्या जीवनात बदल घडवेल असाच विश्वास तिला असावा. लाडक्या ‘परी’साठी पोलीस भरतीत सामील झाली. शनिवारी पोलीस भरतीत तिने शंभर मीटर धावण्याची चाचणी जिंकली. पश्चात तिची आठशे मीटर चाचणीसाठी निवड झाली.यापूर्वी तिने मुलीला महिला पोलिसांनी सांभाळावे, अशी विनंती केली. मात्र, ‘परी’ला आई न दिसल्याने ती रडू लागली. तिच्या मातृत्वाची नजरही वारंवार परीवरच होती. अशा परिस्थितीत तिने शर्यतीत विजय मिळविला. तिच्या मातृत्वाला आणि जिद्दीला सलाम.