शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा निकालात शायनिंग

By admin | Updated: June 18, 2014 01:18 IST

८८.0१ टक्के निकालासह अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे.

वाशिम :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहाव्या वर्गाच्या परीक्षेच्या १७ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात वाशिम जिल्हा ८८.0१ टक्के निकालासह अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. मागीलवर्षी दहावी परीक्षेत वाशिम जिल्हा ७५.७८ टक्के निकालासह तिसर्‍या क्रमांकावर आला होता.यावर्षी जिल्ह्याने निकालात व टक्केवारीतही आघाडी घेतली आहे.
वाशिम जिल्ह्यातून यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १८,६५0 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.त्यात १0,५९४ मुले तर ८,0५६ मुलींचा समावेश होता.त्यापैकी १८,५६0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यात १0.५३७ मुले तर ८,0२४ मुली होत्या.त्यातील १६.३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.0१ टक्के आहे.या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९,0४८ मुले तर ७,२८७ मुली आहेत.त्यांपैकी उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८५.८७ तर मुलींची टक्केवारी ९0.९२ टक्के आहे.
जिल्ह्यात उत्तीर्ण १६,३३५ विद्याथ्यापैकी ३,४५९ विद्यार्थी प्रावीण्यश्रेणीत ,६,८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५,00३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.


** मुला-मुलींची विभागात आघाडी

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहाव्या वर्गाच्यापरीक्षेत यंदा वाशिम जिल्ह्यातील मुला-मुलींनी अनुक्रमे ८५.८७ व ९0.८२ टक्के निकालासह विभागात मुला-मुलींमध्ये सर्वाधिक टक्केवारी प्राप्त केली आहे.

** दोन शाळा डेंजर झोनमध्ये

मागीलवर्षी जिल्ह्यातील २0 टक्केपेक्षा कमी निकाल असलेल्या दोन शाळा होत्या.यावर्षी अशा २0 टक्केपेक्षा कमी निकाल असलेल्या शाळांची संख्या दोन एवढीच राहिली आहे. केन्द्रीय एससी माध्यमिक आश्रमशाळा मंगरुळपीर व मॉडर्न उदरु सेकंडरी स्कूल काळीकारंजा या शाळांचा निकाल २0 टक्केपेक्षा कमी लागला आहे.

** शंभर नंबरी शाळांची संख्या १५ने वाढली

मागीलवर्षी जिल्ह्यातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्केएवढा लागला होता.यंदा शंभर टक्के निकालाच्या शाळांची संख्या वाढून ३२ झाली आहे.

रिसोड तालुका जिल्ह्यात अव्वल

वाशिम :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहाव्या वर्गाच्या परीक्षेच्या निकालात ुरिसोड तालुका ८९.७९ टक्के निकालासह प्रथम क्रमांकावर आला आहे.
रिसोड तालुक्याच्या खालोखाल ८९.१६ टक्के निकालासह मालेगाव तालुका दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.वाशिम तालुका ८८.३१ टक्के निकाल प्राप्त करीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेला कारंजा तालुका यावेळी ८७.८0 टक्के निकालासह चवथ्या क्रमांकावर आहे.जिल्ह्यात शैक्षणिक बाबतीत सर्वात मागासलेला मानला जाणारा मानोरा तालुका ८६.८७ टक्के निकालासह पाचव्या क्रमांकावर आला आहे.एरवी निकालात मानोर्‍याच्या पुढे राहणारा मंगरूळपीर तालुका यावर्षी ८६.१६ निकालासह सहाव्यास्थानी आहे.