शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मद्यात गुंगीचे औषध टाकून तरूणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:29 IST

पालन पोषणासह लग्न लावून देण्याचे आमीष दाखवून तरूणीला मद्यातून गुंगीचे औषध देण्यात आले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला.

ठळक मुद्देदाम्पत्याविरुद्ध गुन्हा : नरहरीनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पालन पोषणासह लग्न लावून देण्याचे आमीष दाखवून तरूणीला मद्यातून गुंगीचे औषध देण्यात आले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना नरहरीनगरात घडली असून याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा नितीन हिरूळकर व त्याच्या पत्नीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.नरहरीनगरातील रहिवासी नितीन हिरूळकर व पीडितेचे वडिल मित्र होते. पीडितेच्या वडिलांनीन त्यांच्या संपत्ती विक्रीसंबंधी व्यवहारात नितीन हिरूळकरने मध्यस्थाची भूमिका निभावली. काही कालावधीनंतर पीडितेच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे नितीन हिरूळकर याने मित्राच्या एका मुलीला त्याच्याच घराच्या आवारात राहण्यास खोली दिली. विवाहासह तिच्या पालन पोषणाची जबाबदारीही स्वीकारली. आरोपी हिरूळकर पीडित मुलीकडून घरातील कामे करून घेत असे आणि तिच्याशी अश्लील चाळे करीत असे. पीडित मुलीला अश्लील चित्रफिती दाखवून तिला मद्यातून गुंगीचे औषध देणे, ती नशेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, असा प्रकार सुरू होता. नितीनच्या अशा अश्लील कृत्यात त्याच्या पत्नीचे सहकार्य केल्याचे व हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. न्यायासाठी पीडितेने अनेकदा पोलिसांचे उंबरठे झिजविले. मात्र, या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष चालविण्यात आले होते. दरम्यान पीडितेने तिच्या आईसह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे दार ठोठावले. त्यांच्या निर्देशानुसार राजापेठ पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपी नितीन हिरूळकर व त्याच्या पत्नीविरूद्ध भादंविच्या कलम ३७६ (२),(एन), २९२, १०९, ३५४(अ), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कान्होपात्रा बन्सा करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.