शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘डफरीन’च्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:18 IST

येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना जामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंगळवारी दिले.

ठळक मुद्देआरोग्य संचालकांना पत्र : बांधकाम विभागाला हस्तांतरणासाठी स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना जामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंगळवारी दिले.‘डफरीन’ची नवीन कर्मचारी वसाहत गैरप्रकाराचा अड्डा’ या आशयाखाली १९ जून रोजी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. जिल्हा स्त्री रूग्णालयाचे अधीक्षकांनी बांधकाम अभियंता, कंत्राटदार यांचेशी संपर्क साधला. वसाहतीत वीज, पाणीपुरवठा त्वरित करून ही वास्तू हस्तांतरित करावी, असे कळविले. नवी वसाहत हस्तांतरित होईस्तोवर सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी, अशी तंबी जामठे यांनी कंत्राटदाराला भ्रमणध्वनीवरून दिली. येथे गैरप्रकाराला आळा बसावा, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डफरीन, सुपर स्पेशालिटी रूग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी सोपविली आहे. जूनअखेर ही वास्तू ताब्यात घेऊन कर्मचाºयांना निवासासाठी हस्तांतरित केली जाईल, असा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. येथे वीज, पाणी पुरवठ्याची वानवा असल्याबाबत आरोग्य संचालकांना पत्र पाठविले आहे.नव्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमले आहे. जूनअखेर ही वास्तू ताब्यात घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरू झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य संचालकांना अवगत केले.- अर्चना जामठे,अधीक्षक, जिल्हा स्त्री रूग्णालय, अमरावती