शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात बियाणे महागले

By admin | Updated: June 12, 2016 00:01 IST

: सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.

शेतकऱ्यांचे शोषण : महाबीजच्या बियाण्यांतही ४० टक्क्यांची दरवाढअमरावती : सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे शासनाने बियाणे व खतांच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी दिली असताना महाबीजने केलेली दरवाढ म्हणजे विश्वासघात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे व अशा स्थितीत महाबीजने बियाण्यांची दरवाढ केली आहे. आतापर्यंत स्वस्त आणि रास्त दरात राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज उपलब्ध करून देत आहे. डाळवर्गीय बियाण्यांच्या किमतीत तब्बल ५० टक्यांनी वाढ केली आहे. महाबीजने या निर्णयामुळे बाजारात सर्वच खासगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे.मागील वर्षीची खरीप व रबीचा हंगाम पावसाअभावी वाया गेला. पेरणीचा खर्च निघाला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने बियाण्यांच्या दरात अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना त्यांच्या पदरी निराशा आली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महाबीजने नफा कमविण्यासाठी दरवाढ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)डाळवर्गीय बियाण्यात ५० टक्क्यांची दरवाढमागील वर्षीपासून डाळीची किंमत २०० रुपयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे यंदा शेतकरी डाळवर्गीय पिके अधिक घेणार बाजार डाळवर्गीय बियाण्यांची टंचाई आहे अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांच्या किमती ५० टक्यापर्यंत वाढविल्या आहेत.