शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकाच्या हकालपट्टीचा शाळा समितीने के ला ठराव

By admin | Updated: October 3, 2015 00:07 IST

तालुक्यामधील नांदुरी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाची हकालपट्टी करावी, ...

विद्यार्थ्यांना मारहाण : रुजू न करण्याच्या बीडीओच्या सूचनाधारणी : तालुक्यामधील नांदुरी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाची हकालपट्टी करावी, असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने घेतला तर त्या शिक्षकाला रुजू न करण्याच्या मौखिक सूचना बिडीओ यांनी मुख्याध्यापकाला दिल्या आहेत. नांदुरी या गावातील जि. प. शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बुधवारी पायाभूत चाचणी पेपर घेण्यात आले. वर्गशिक्षक निलेश पटोरकर यांनी उत्तरपत्रिका पाहिले असता विद्यार्थ्यांनी पेपर समाधानकारक लिहीले नसल्याचे लक्षात येताच त्यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना बेदम मारून झोडून काढले. पालकांनी प्रकरण पोलिसात दाखल केले व आरोपी शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला काल न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मात्र या सर्व प्रकरणाने मेळघाटातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम केले आहे.पालकांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी रामचंद्र जोशी यांनी संबंधित शिक्षकाला शाळेत रुजू करु नका, असे मौखीक आदेश मुख्याध्यापक व्ही. के. करोची यांना दिले तर गुरुवारी दिवसभर पोलीस स्टेशन व कोर्टाची हवा खाल्याने शिक्षकाचेही मनोबल ढासळले. याच शिक्षकाला नांदुरी वासीयांनी यापूर्वी सुद्धा स्थानांतरणाची मागणी देण्याचा ठराव एक वर्षापूर्वी केला होता. परंतु माफीनाम्यानंतर त्याला सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र शिक्षकात काळीचाही फरक झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शालिकराम दहीकर यांच्या उपस्थितीत शाळा समितीने पुन्हा नीलेश पटोरकर याची हकालपट्टीचा ठराव घेतला. शुक्रवारी शाळेत मुख्याध्यापक करोची यांच्या उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात आली. यात पोलीस पटेल, छगन खडके यांच्यासह गणमान्याची उपस्थिती होती. परंतु दरवर्षीचा उत्साह यात दिसला नाही. (तालुका प्रतिनिधी)