शिष्यवृत्ती परीक्षेचा तिढा अखेर सुटला

By Admin | Updated: August 23, 2014 23:42 IST2014-08-23T23:42:11+5:302014-08-23T23:42:11+5:30

कुठल्याही अभ्यासक्रमाविना शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरुपाबाबतची समस्या आता सुटली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा

The scholarship examination was finally finished | शिष्यवृत्ती परीक्षेचा तिढा अखेर सुटला

शिष्यवृत्ती परीक्षेचा तिढा अखेर सुटला

नवा बदल : नव्या अभ्यासक्रमावर आधारित आराखडा जाहीर
अमरावती : कुठल्याही अभ्यासक्रमाविना शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या स्वरुपाबाबतची समस्या आता सुटली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने चौथीच्या नव्या अभ्यासक्रमावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेचा आराखडा प्रसिद्धीस दिल्याने याची विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
राज्य शासनाच्या शैक्षणिक नियोजनानुसार यंदा इयत्ता चौथीचा अभ्यासक्रम बदलला होता. हा अभ्यासक्रम बदलल्याने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रमही बदलविणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा, असा प्रश्न चौथीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसमोर पडला होता. ही बाब लक्षात घेऊन परीक्षा परिषद आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी हालचाली सुरू करून अखेर हा अभ्यासक्रम २२ आॅगस्टपासून जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर अभ्यासक्रमाची विषय योजना व घटकनिहाय गुण विभागणीचा कच्चा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भात काही लेखी अभिप्राय अथवा तक्रारी असल्यास त्या शिक्षण परिषदेच्या े२ूीस्र४ल्ली@ॅें्र’.ूङ्मे या वेबसाईट वर पाठविता येणार आहे. दरम्यान या शासनाच्या निर्णयामुळे इयत्ता चौथी मधील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये असलेला तर्क विर्तकांना पूर्ण विराम मिळाला आहे.
गेल्या काही दिवसापासून याबाबत संभ्रमाचा तिढा यामुळे निकाली निघाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The scholarship examination was finally finished