संजय गांधीनगरचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:55 IST2017-11-11T22:55:24+5:302017-11-11T22:55:44+5:30
शहरातील संजय गांधीनगरात १९७८ सालापासून राहत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी तिथेच वास्तव्यास राहता येईल यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, ....

संजय गांधीनगरचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील संजय गांधीनगरात १९७८ सालापासून राहत असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी तिथेच वास्तव्यास राहता येईल यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, अमरावतीच्या उपमहापौर व प्रभागाच्या नगरसेविका संध्या टिकले, नगरसेवक अजय गोंडाणे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ ना. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. ना. गडकरी यांनी सर्व परिस्थिती जाणून घेऊन यासंदर्भात राज्य शासन व केंद्र शासन लोकांच्या बाजूने कारवाई करेल, असे आश्वासन दिले. या विषयात त्यांनी संबंधित अधिकाºयांना व मंत्र्यांना सूचनाही दिल्या आहेत. ना. गडकरी यांच्या भूमिकेमुळे लवकरच संजय गांधीनगरातील नागरिकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या शिष्टमंडळात भाजपचे कुणाल टिकले, राजू रामटेके यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांचा समावेश होता.