शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रॉयल्टीने वाळूची वाहतूक

By admin | Updated: December 6, 2014 00:38 IST

नदीतून वाळू उपस्याला मनाई असली तरी बनावट रॉयल्टीने वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

अमरावती : नदीतून वाळू उपस्याला मनाई असली तरी बनावट रॉयल्टीने वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महसूल बुडवून चोरी करायची वाळू तस्करांनी जणू शक्कलच लढविली आहे. बनावट रॉयल्टीने वाळूची वाहतूक करण्याची युक्ती ही महसूल अधिकाऱ्यांनीच दिल्याची माहिती आहे. वाळू तस्करीचे धागेदोरे खोलपर्यंत असल्याने लहान-सहान अधिकाऱ्यांना ती थांबविणे कठीण आहे. नदी पात्रातून वाळू उपस्याला मनाई असताना चक्क जेसीबीने वाळू उपसा होत असेल तर हा प्रकार थांबविणार कोण? हा सवाल उपस्थित होत आहे.
वाळू तस्करीचे मार्ग बदलले
अमरावती : एकीकडे वाळू उपसा बंद असल्याचा देखावा करुन मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करुन महसूल बुडविण्याचा धंदा तस्करांनी चालविला आहे. नदी पात्रातून वाळुचा उपसा करुन ही वाळू वाहतूक करताना ती साठवून ठेवलेली आणली जात आहे. याकरीता वाळू तस्करांनी बनावट रॉयल्टी ट्रक चालकांजवळ देण्याची शक्कल लढविली आहे. ही बनावट रॉयल्टी सोबत असली की एखाद्या अधिकाऱ्यांने वाळुची वाहतूक करताना वाहन तपासले तर ती दाखवून वाहतूक करणे सुकर होते. हा प्रकार जिल्ह्यात राजरोसपणे सुरु आहे. नदी, नाल्यातून वाळू उपसा करुन चढ्या दराने वाळू विकण्याचा प्रकार महसूल विभागाला रोखणे दुरापास्त झाले आहे. वाळू तस्कर दरदिवसाला नवनवीन क्लुप्त्या लढवून महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ‘नहले पे दहला’ अशी खेळी करीत वाळू वाहतूक बिनधास्तपणे करीत आहेत. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का असा रॉयल्टीत उल्लेख असणे अनिवार्य आहे. मात्र हल्ली वाळू तस्करांनी नदीपात्रातून वाळू उपसा करुन ती वाहतूक करताना बनावट रॉयल्टी देण्याचा धंदा सुरु केला आहे. या अफलातून प्रकाराने वाळू तस्करीतून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एवढेच नव्हे तर क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणून महसुल बुडवित असताना महसूल अधिकारी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे या गंभीर विषयाकडे प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)