शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या कंत्राटदाराकडून मेळघाटात नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

फोटो - चिखलदरा ०३ एस मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सिमेंट रस्त्यात मातीमिश्रित रेतीचा वापर, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंचनामा लोकमत विशेष ...

फोटो - चिखलदरा ०३ एस

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सिमेंट रस्त्यात मातीमिश्रित रेतीचा वापर, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंचनामा

लोकमत विशेष

चिखलदरा : मेळघाटात सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मध्य प्रदेशतील कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात नियमाला तिलांजली देत कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या सिमेंट रस्त्यामध्ये दगड-धोंडे आणि नदी-नाल्यांतील मातीमिश्रित रेतीचा वापर करण्यात आल्याची तक्रार आदिवासी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे केल्यावर सरपंच, उपसरपंचांनी सदर कामाची पाहणी केली. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात मध्य प्रदेशातील राजेंद्रसिंह किल्लेदार प्रायव्हेट लिमिटेड कंट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराकडून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची विविध मार्गावरील रस्त्यांची कामे केली जात आहेत. संबंधित कंत्राटदार शासकीय अभियंत्यांना हाताशी धरून कोट्यवधीच्या कामांवर नियम धाब्यावर बसविला जात असल्याचा प्रकार वारंवार समोर आला आहे. तरीदेखील संबंधित अभियंत्यांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, हे विशेष.

बॉक्स

आदिवासी ग्रामस्थ धडकले

परतवाडा ते धारणी मार्गावरील तालुक्यातील घटांग हे मुख्य गाव असून, तेथून भुलोरी ते लवादा या दुर्गम गावासाठी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामात संबंधित कंपनीकडून मातीमिश्रित रेती आणि सिमेंट रस्त्यांमध्ये मोठे दगड, धोंडे टाकले जात असल्याचा प्रकार आदिवासी गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच साबूलाल बेठे, उपसरपंच दीपेश बेलकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला.

------------

कोट्यवधीची कामे, अभियंता बेपत्ता

मध्य प्रदेशच्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांची जरब नाही. देखरेखीसाठी असलेले शासकीय अभियंता कामाची पाहणी करीतच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे निकृष्ट कामाची मालिका येथे सुरू आहे.

-------------

भुलोरी ते लवादा सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे आणि नदी-नाल्याच्या मातीमिश्रित रेतीचा वापर केली जात असल्याचा प्रकार प्रत्यक्ष भेट दिल्यावर उघड झाला. संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

- साबूलाल बेठे, सरपंच, भुलोरी

कोट

संबंधित कामासंदर्भात माहिती घेऊन प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल. योग्य साहित्य आणि कामाचा दर्जा यावर स्वतः तपासणी करू.

- आय. आय. खान, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती

---------

फोटो कॅप्शन : चिखलदरा तालुक्यातील भुलोरी, लवादा या मार्गावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामात दगडधोंडे मातीमिश्रित रेतीचा वापर केल्या जात असल्याचा प्रकार सरपंच बाबूलाल बेठे उपसरपंच दीपेश बेलकर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी उघड आणून निकृष्ट काम करणाऱ्या वर कारवाईची मागणी केली आहे