शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकाविना रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मुख्य रस्त्यावर योग्य तºहेने व ठिक-ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे असे अनेक अपघात घडले आहेत.

ठळक मुद्देअनेक अपघात : शहरवासीयांमध्ये असंतोष, मुख्य मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मुख्य महामार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी समोर आली आहे. अमरावती ते पांढुर्णा महामार्ग झाल्यापासून मोर्शी शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेक संघटनांनी निवेदन देऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मोर्शीकर करीत आहेत.कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास सप्टेंबरमध्ये शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच रस्त्यावरील रहदारी व गर्दीचे प्रमाण वाढणार आहे. गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहणाºया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मुख्य रस्त्यावर योग्य तºहेने व ठिक-ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे असे अनेक अपघात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बनविण्यात यावे. वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे यावर तातडीने अंमल व्हावा, असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.जीव जाण्यापूर्वी लावायापुढे अपघातामुळे कोणाचे जीव जाण्याअगोदर मुख्य महामार्गावर, मुख्य चौक, रहदारी व गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. भाजयुमो, भाजप शहराध्यक्ष रवी मेटकर, तालुकाध्यक्ष अजिंक्य लुंगे, निखिल टेकाडे, शहराध्यक्ष आकाश ढोमणे, सरचिटणीस मनीष इंगळे, गौरव आखरे व चेतन घाटोळे, बलराम द्विवेदी, लकी पुरोहित, राहुल पंडागरे, अजय धुर्वे, रोशन गिद, सचिन गोमकाळे उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्ग