शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

धारणी येथे मूलभूत सुविधा नसल्याने रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

सर्व्हे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे हरिहरनगर हे खासगी ले-आऊट असून, तेथे ग्रामपंचायत दियामार्फत कोट्यवधी रुपयांची अवैधरीत्या विकासकामे करण्यात आली आहेत. हरिहरनगरमध्ये खासगी अभिन्यासधारकाने रस्ते व नालीचे बांधकाम करणे आवश्यक होत.  मात्र, तलाई कॅम्प भागातील शासकीय लेआउटमधील विकासनिधी वेळोवेळी हरिहरनगरमध्ये पळविण्यात आला. याची चौकशी होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देखासगी ले-आऊटसाठी पळविला विकास निधी

श्यामकांत पाण्डेयलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहराला लागून असलेल्या सर्वे नंबर १३२ म्हणजेच तलाई कॅम्प हे मौजा दिया अंतर्गत येणाऱ्या तलाई  गावाचा ले-आऊट झालेला भाग. परंतु, या भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते, नाली, पाणीपुरवठा पाईपलाईन नसल्यामुळे सुशिक्षितांच्या या क्षेत्रात सर्वच वंचितसारखे राहत आहेत. सर्व्हे नंबर १३२ ला लागून उत्तरेकडे हरिहरनगर हे खासगी ले-आऊट असून, तेथे ग्रामपंचायत दियामार्फत कोट्यवधी रुपयांची अवैधरीत्या विकासकामे करण्यात आली आहेत. हरिहरनगरमध्ये खासगी अभिन्यासधारकाने रस्ते व नालीचे बांधकाम करणे आवश्यक होत.  मात्र, तलाई कॅम्प भागातील शासकीय लेआउटमधील विकासनिधी वेळोवेळी हरिहरनगरमध्ये पळविण्यात आला. याची चौकशी होणे गरजेचे आहे. येथील  प्राध्यापक कॉलनी थोडीफार विकसित झाली आहे. एक-दोन रस्ते या भागात दिसून येतात. मात्र, उर्वरित सर्वे नंबर विकासापासून पूर्णपणे वंचित आहे. या भागात अनेक गर्भश्रीमंतांनी बांधकाम करताना स्वत:ची जागा पूर्णपणे बांधून आजूबाजूतील रस्ते व गल्लीतसुद्धा अतिक्रमण करून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे अनेकांना ये -जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी सर्वे नंबर १३५ चा वाद चव्हाट्यावर आला होता. तेथील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

परस्पर विक्रीचा आरोपसर्वे  नंबर १३२ लगत उत्तरेकडे वासुदेव खार्वे यांचे शेत होते. कालांतराने ती शेती अशोक खारवे यांच्या नावे करण्यात आली. अशोक खार्वे यांनी धारणी तालुक्यातील सर्वात पहिली अकृषक आणि खासगी ले-आउट निर्मित केले. असे करताना पूर्ण भूखंड विक्री केले. त्यानंतर उत्तरेकडील काही शासकीय भूखंड अवैधरीत्या विक्री केल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. याचीसुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे.

सर्वे नंबर १३२ मध्ये गैरप्रकार घडले. या सर्व गैरप्रकारांची लवकरच चौकशी करण्यात येऊन प्रसंगी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल. - दुर्गा बिसंदरे,सदस्य, ग्रामपंचायत, दिया

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण