शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नदीपुलाचा सुधारित सहा कोटींचा प्रस्ताव दाखल !

By admin | Updated: March 31, 2017 00:18 IST

बनोसा-बाभळीला जोडणारा चंद्रभागा नदीवरील लहान पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

धोकादायी : मंजुरी मिळाल्यास अपघात टळणारदर्यापूर : बनोसा-बाभळीला जोडणारा चंद्रभागा नदीवरील लहान पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ६ कोटींचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्या पुलाची मंजुरी मिळवून लांबी रुंदी व उंची वाढविल्यास संभाव्य अपघात टळू शकतील. ३० ते ३५ वर्षात या पुलाखाली अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहे. अंदाजे ३५ ते ४० जणांचे प्राण या पुलावरुन खाली पडून गेले आहे. त्यामुळे बाभळीवासियांची तो पुल मोठा करण्याची अनेक वर्र्षींची मागणी आहे. हा प्रश्न "लोकमत"नेही लोकदरबारात मांडला आहे. आ. प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आमदार रमेश बुदिंले याच्यामार्फत त्या पुलाचा नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी ५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पण आता या पुलाची सुधारित किंमत वाढली आहे. ६ कोटींचा प्रस्ताव नव्याने तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अल्प पावसामुळेही पुलावरून पाणी वाहते. बाभळी व बनोस्याला जोेडणारा हा जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून पाणी असतानाही जीव धोक्यात टाकून नागरिकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहे. या पुलाच्याजवळ मोठा डोह असून या डोहात कुणी पडले तर त्याला आपला जीव गमवावा लागतो. या ठिकाणी उन्हाळयातही पाणी साचलेले राहते. त्यामुळे येथे मोठ्या कपारी पडल्याची माहिती काही जाणकार देतात. त्यामुळे हा पूल तोडून मोठा पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. ( तालुका प्रतिनिधी)