शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात मोलकरणीने चोरले २२ टीव्ही, अल्पकिंमतीत विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:01 IST

प्रतिष्ठानचे संचालक जयसिंघाणी यांचे वास्तव्य लालपूल परिसरात सिंधी कॉलनी येथे आहे. अनेक वर्षांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या व्यवसायात असून, आपल्या राहत्या घरी, एका खोलीत ते इलेक्ट्रॉनिक्स साहित्य ठेवतात. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी त्या खोलीत ठेवलेले दोन टीव्ही जयसिंघाणी यांना दिसून आले नाहीत. संशय बळावल्याने त्यांनी पाळत ठेवली असता, घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एका युवकाला हाताशी धरून टीव्ही लंपास केल्याचे कबूल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक अनिल टीव्ही या प्रतिष्ठानाच्या संचालकांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एक-दोन नव्हे, चक्क २२ टीव्ही लंपास केल्याची तक्रार परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यातील काही टीव्ही हस्तगत केल्याची माहिती आहे. प्रतिष्ठानचे संचालक जयसिंघाणी यांचे वास्तव्य लालपूल परिसरात सिंधी कॉलनी येथे आहे. अनेक वर्षांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या व्यवसायात असून, आपल्या राहत्या घरी, एका खोलीत ते इलेक्ट्रॉनिक्स साहित्य ठेवतात. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी त्या खोलीत ठेवलेले दोन टीव्ही जयसिंघाणी यांना दिसून आले नाहीत. संशय बळावल्याने त्यांनी पाळत ठेवली असता, घरी काम करणाऱ्या मोलकरणीने एका युवकाला हाताशी धरून टीव्ही लंपास केल्याचे कबूल केले. अशा प्रकारे घरातून आतापर्यंत २२ टीव्ही चोरीला गेल्याची बाब जयसिंघाणी यांच्या लक्षात आली. चोरीला गेलेल्या या एका टीव्हीची किंमत १५-१६ हजार रुपये असताना, चोरणाऱ्या दोघांनी ते केवळ दोन ते तीन हजार रुपयात विकले. ज्यांनी हे चोरीचे टीव्ही घेतले होते, त्यांच्याकडून यातील काही टीव्ही हस्तगत करण्यात यश आले आहे. दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने परतवाडा पोलीस ठाण्यात जयसिंघाणी यांनी ५ फेब्रुवारीला सायंकाळी ही माहिती दिली. त्यात मोलकरणीवर संशय व्यक्त केला. त्या आधारावर मोलकरीण महिलेसह एका युवकाला पोलिसांनी चौकशीकरिता बोलावल्याचे वृत्त आहे. घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात कुठलीही लेखी तक्रार वृत्त लिहिस्तोवर दाखल करण्यात आली नाही. चोरीला गेलेले टीव्ही हस्तगत होत असल्यामुळे जयसिंघाणी यांनी टीव्ही लंपास करणाऱ्यांप्रति मवाळ धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. दरम्यान, स्टॉक व्हेरिफिकेशन सुरू आहे. यानंतरच चोरीला गेलेल्या टीव्ही संचांचा निश्चित आकडा सांगता येईल, असे जयसिंघाणी यांनी स्पष्ट केले. परतवाडा पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Thiefचोर