शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नावनोंदणीला जिल्हाभरात प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2015 00:11 IST

राष्ट्रीय मतदार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत ३ मार्च ते ३१ जुलैदरम्यान मतदार याद्या विशेष मोहीम ...

प्रमाणीकरण : मतदान केंद्रांवर राबविण्यात आली विशेष मोहीमअमरावती : राष्ट्रीय मतदार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत ३ मार्च ते ३१ जुलैदरम्यान मतदार याद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १७ मे रोजी जिल्हाभरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची नावनोंदणी, आधार कार्ड, रेशनकार्ड यांची नोंदणी करण्यात येत होती. या राष्ट्रीय कामांसाठी शिक्षक संघटनांनी प्रथम नकार दर्शविला होता. तरीही विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी मतदार नोंदणीत विशेष सहभाग नोंदविला होता. मतदारांच्या मतदार छायाचित्र ओळखपत्रातील माहितीशी मतदाराचा आधार क्रमांक जोडण्यासाठी दुबार असलेली नावे कमी करण्यासाठी मतदारांच्या तपशिलात दुरूस्ती करण्यासाठी पुराव्यासह प्राप्त नमुना ८ मधील अर्जावर १५ दिवसांत निर्णय घेण्यासाठी मतदारांच्या छायाचित्रात सुधारणा करण्यासाठी मतदारांचा मोबाईल क्रमांक ई-मेल, पत्ता आदी दुरुस्तीसाठी आणि नव्याने मतदार नोंदणीसाठी शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना नाव नोंदणीसाठी आणि चुकांची दुरूस्ती करण्यासाठी या मोहीम केंद्रावर मतदारांची गर्दी काही ठिकाणी दिसून आली. यासोबतच तहसीलदार कार्यालयातदेखील नावनोंदणी आणि दुरूस्तीचे काम राबविण्यात येत होते. या विशेष मोहिमेतून शिक्षकांना वगळण्यात यावे म्हणून काही शिक्षक संघटनांनी निवेदन देऊन याला विरोध केला होता. मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढत मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळविले आहे. (प्रतिनिधी)जून, जुलैमध्ये विशेष मोहीममतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण करण्याची विशेष मोहीम ही चार महिन्यांत राबविण्यात येणार होती. त्यापैकी एप्रिल व मे महिन्याची मोहीम संपली आहे. आता २१ जून आणि १२ जुलै रोजी पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ज्या मतदारांची दोन ठिकाणी नावे असतील त्या मतदारांनी स्वत: एक नाव कमी करायचे आहे. तसेच ज्यांचे आधार क्रमांक देण्याचे बाकी आहे, त्यांनी त्याची नोंद करावी. - मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक.