शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात गणपती स्थापनेवरून वाद

By admin | Updated: September 19, 2015 00:23 IST

बडनेरा एमआयडीसी परिसरातील निभोंरा येथील मुलांच्या वसतीगृहात गणपती स्थापनेवरून झालेला वाद शुक्रवारी दुपारी सामाजिक न्याय भवनात पोहोचला.

हिंदू संघटना सरसावल्या : सामाजिक न्याय भवनात विद्यार्थ्यांचा ठिय्याअमरावती : बडनेरा एमआयडीसी परिसरातील निभोंरा येथील मुलांच्या वसतीगृहात गणपती स्थापनेवरून झालेला वाद शुक्रवारी दुपारी सामाजिक न्याय भवनात पोहोचला. विद्यार्थ्यांकडून हिन्दू संघटनानी पुढाकार घेऊन समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त डी.डी. फिस्के यांना जाब विचारल्याने एकच गोंधळ उडाला.शासकीय वसतीगृह परिसरात सार्वजनिक उत्सवाला परवानगी नसतानाही काही विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिष्ठापना केली. काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविल्याने वादाला सुरुवात झाली. त्याबाबत काही विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहआयुक्त डी.डी. फिस्के यांच्या दालनात ठिय्या मांडला. तेथे हिन्दुत्ववादी सघंटनेचे विनोद शर्मा, राहुल माटोडे, निरंजन दुबे, नीलेश सावळे, प्रतीक दुधाने, अभिजित सवई समाजकल्याण सहआयुक्तांच्या दालनात पोहोचले. त्यांनीही विद्यार्थ्यांची बाजू मांडली. मात्र, शासकीय वसतिगृहात सार्वजनिक उत्सवांना परवानगी नसल्याचे सहआयुक्त फिस्के यांनी सांगितले. सहआयुक्तांच्या दालनात विद्यार्थ्यांच्या गोंधळ होत असल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या नेतृत्वात पीएसआय इंगळे यांनी मध्यस्ती करून वाद निवळण्याचा प्रयत्न केला. अखेर सहआयुक्तांनी वसतिगृहात अधिकाऱ्यांना चौकशीकरिता पाठविले होते. शासकीय परिसरात सार्वजनिक उत्सवांना परवानगी नाही. तरीही काही विद्यार्थ्यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्याला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना वैयक्तीकरीत्या गणपतीची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत काही संघटनांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. - डी.डी. फिस्के, सहआयुक्त, समाजकल्याण विभाग.