धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:04 IST2026-01-26T11:03:59+5:302026-01-26T11:04:38+5:30

Republic Day 2026: अमरावती पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांचा थरारक पराक्रम

Republic Day 2026 Salute to courage Amravati police officer hoists tricolor for 1 minute and 22 seconds under 11 feet of water | धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा

धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा

अमरावती: महाराष्ट्र पोलीस दलात धाडस, शौर्य आणि कर्तृत्वाची परंपरा जपणारे अनेक अधिकारी व अंमलदार आहेत. त्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार प्रवीण दादाराव आखरे यांनी आपल्या असामान्य साहसाने पुन्हा एकदा पोलीस दलाचा मान उंचावला आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर, प्रवीण आखरे यांनी कोणत्याही ऑक्सिजन उपकरणाचा वापर न करता, तब्बल ११ फूट खोल पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद श्वास रोखून तिरंगा ध्वज फडकावला. हा थरारक आणि प्रेरणादायी उपक्रम अमरावती पोलीस जलतरण केंद्रात पार पडला.

हा उपक्रम पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ आणि शाम घुगे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडला. यावेळी आखरे यांनी हातात देशाचा तिरंगा अभिमानाने धरत “हर घर तिरंगा” या संकल्पनेला जलतरण केंद्राच्या पाण्यातून अनोखा साकार दिला.

कोण आहेत प्रवीण आखरे?

प्रवीण आखरे हे अमरावती पोलीस आयुक्तालयातील जीव रक्षक तसेच शोध व बचाव पथकात कार्यरत असून, याआधीही त्यांनी अनेक साहसी आणि विक्रमांची नोंद असलेले उपक्रम केले आहेत. पाण्याखाली व पाण्यावर योगासने सादर करत त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. तसेच पाण्यात सायकल चालवणे, स्केटिंग करत तिरंगा फडकावणे, अशा अभिनव उपक्रमांतून त्यांनी अमरावती पोलीस मुख्यालयाचा गौरव वाढवला आहे.

या धाडसी उपक्रमाची माहिती मिळताच, अमरावतीच्या “लेडी गव्हर्नर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलाताई गवई यांनी सोमवारी अचानक पोलीस मुख्यालयाच्या जलतरण केंद्राला भेट देत प्रवीण आखरे यांचे स्वतः उपस्थित राहून स्वागत व अभिनंदन केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्ती, शौर्य आणि सेवाभाव यांचा संगम साधणारा हा उपक्रम सध्या सर्वत्र प्रशंसेचा विषय ठरत आहे.

Web Title : अमरावती: पुलिस अधिकारी ने पानी के नीचे तिरंगा फहराकर साहस दिखाया!

Web Summary : अमरावती के पुलिस अधिकारी प्रवीण आखरे ने गणतंत्र दिवस पर बिना ऑक्सीजन के पानी के नीचे 82 सेकंड तक तिरंगा फहराया। वरिष्ठ अधिकारियों की उपस्थिति में पुलिस तरणताल में उनके साहसपूर्ण कार्य ने देशभक्ति और सेवा का जश्न मनाया, जिससे उन्हें प्रशंसा मिली।

Web Title : Amravati Cop Saluted for Underwater Tricolor Display of Bravery!

Web Summary : Amravati cop Praveen Akhare honored the Republic Day by unfurling the Indian flag underwater for 82 seconds without oxygen. His courageous act at the police swimming pool, witnessed by senior officers, celebrates patriotism and service, earning him accolades and recognition.