शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदार होणार बँक प्रतिनिधी

By admin | Updated: January 6, 2017 00:20 IST

रेशन दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळावे,

केंद्र शासनाचे आदेश : जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू अमरावती : रेशन दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडंस) म्हणून काम करण्याची संधी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बँकेच्या ठेवी गोळा करणे कर्जदार शोधणे व कर्ज वसुलीचे काम मिळणार आहे. यावर त्यांना मानधन मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रेशन दुकान व रॉकेल विक्रेत्यांना व्यावसायिक प्रतिनिधीसंदर्भात जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेत. ही योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्याची सूचनाही केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली आहे. यात लिड बँकेचे प्रबंधक, जिल्हास्तरीय राष्ट्रीय सूचना केंद्राचे प्रतिनिधी (एनआयसी) जिल्ह्यातील बँकांचे प्रादेशिक प्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी, मायक्रो एटीएम तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी समिती कार्यरत झाली आहे. रेशन व्यवस्था आधार कार्डशी लिंक केल्याने व वार्षिक एक लाख रुपयांची अट घातल्याने रेशनवरील लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. स्वयंपाकासाठी मुबलक गॅस मिळू लागल्याने रॉकेलचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. रॉकेलमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. रेशनच्या दुकानात बहुतांश व्यक्ती महिन्यातून एकवेळ भेट देत असतात. रेशन दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांचे जाळे देशभर पसरले आहे. रेशन दुकानदारांना अधिक लाभ व्हावा व बँकींग व्यवस्था बळकट व्हावी यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेसाठी इच्छुक रेशन दुकानदारांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर या रेशन दुकानांची जबाबदारी बँकांना देण्यात येणार आहेत. रास्त भाव दुकानात व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना महिन्यातून कमीत कमी १० दिवस सेवा देणे अनिवार्य राहणार आहे. व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना दुकानदारांना बँकांनी त्यांच्या धोरणानुसार मानधन द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रेशन दुकानात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच या दुकानदारांना अथवा त्यांच्या घरातील मुलांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे काम सुरू केले आहे. - बी. के. वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी