शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: December 13, 2014 00:37 IST

वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

अमरावती : वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन नुकतेच येथील त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी वडाळी, देवीनगर, प्रबुध्दनगर, गजानननगर येथील शेकडो नागरिक उपस्थित होते. वडाळी परिसरातील अनेक कष्टकरी व मजूर आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नवीन रेशनकार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या नागरिकांसाठी असलेल्या नमुना अ मिळविण्याचा कालावधी वाढवून देणे, रेशन कार्डातून नाव कमी करणे, मुलांच नावे समाविष्ट करणे, दुय्यम पत्रिका देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वर्ष २००५-०६ मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्वेक्षणामधून अनेक गरीब कुटुंबांची नावे वगळण्यात आली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ज्या कुटुंबांजवळ दारिद्रय रेषेचे कार्ड नाही, त्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना व इतर योजनांपासून वंचित रहावे लागते. अशा सर्व जाती, प्रवर्गातील सर्व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांची नावे दारिद्रय रेषेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना परिसरातील त्रस्त नागरिक संजय चव्हाण, रामेश्वर आंबेकर, सैयद अख्तर मदारी, अमोल गोफणे, राकेश उसरेटे, राजू व्यवहारे, प्रमोद राऊत, संजय वानखडे, राजेश मुंजाडे, बाळासाहेब जेवडे, सागर खुळे, आरिफ खाँ मदारी, शिवदास गायकवाड, कल्पना वैद्य, शालिनी टाके, प्रणिती दिवे, कविता गंडेवार, ललिता आंबेकर, शशिकला वानखडे, कविता बेनिवाल सचिन काकिरवार, पंकज गुहे, विलास बोस, जानराव बनसोेड आदी उपस्थित होते. रेशन कार्डशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवून नवीन रेशनकार्ड तसेच दारिद्रय रेषा प्रमाणपत्र वडाळी तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांना तातडीने वितरीत करावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक संतप्त नागरिक उपस्थित होेते.