शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: December 13, 2014 00:35 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.

गजानन मोहोड अमरावती
विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांचे खरीप २०१४ साठीचे ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजार पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. दुष्काळसदृश स्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.
जिल्ह्यातील ४१४ परवानाधारक सावकारांनी ९ डिसेंबर २०१४ पर्यंत वाटलेल्या १३२ कोटी ५३ लाख रुपयांपैकी ७/१२ च्या आधारे घेतलेल्या पीक कर्जाचा शासनाद्वारे भरणा होणार आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यामधील वीज बिलांचा भरणादेखील शासन करणार आहे.
खरिपाचे पीक कर्जावरील व्याज माफ
जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकेचे ६१ हजार २७८ शेतकऱ्यांचे ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांचे ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेले ७१२ कोटी रुपयांचे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे.
१३२ कोटींमधील सावकारी कर्ज माफ
जिल्ह्यात ४१४ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी शेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण १३२ कोटी ५३ रुपयांपैकी असणाऱ्या पीक कर्जाचा भरणा शासन करणार आहे. या सावकारांनी ९ डिसेंबर२०१४ पर्यंत कर्ज वितरित केलेले आहे. यातील केवळ पीककर्जाचा भरणा शासन करणार आहे.