शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील रिजेक्टेड तूर पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:14 IST

नाफेडच्या खरेदी केंद्रावर पहिल्या दिवशी विक्रीकरिता आलेला तुरीचा माल रिजेक्ट केल्यावरही ‘ती’ तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आजही पडून असल्याने ....

शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा : ‘त्या’ व्यापाऱ्यावर प्रादेशिक व्यवस्थापकाची मेहेरनजरलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : नाफेडच्या खरेदी केंद्रावर पहिल्या दिवशी विक्रीकरिता आलेला तुरीचा माल रिजेक्ट केल्यावरही ‘ती’ तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आजही पडून असल्याने याचे गूढ रहस्य अद्यापही गुलदस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १२ एप्रिल रोजी धारणीत नाफेडतर्फे आदिवासी विकास महामंडळाद्वारे तूर खरेदी सुरू केली होती. पहिल्याच दिवसी हजारो पोते तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात आणल्या गेल्या. या तूर उत्पादकांमध्ये शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचीच गर्दी होती. आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारी आणि व्यापाऱ्यात पूर्वीपासूनची गोड नाती जपण्यासाठी पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांचीच तूर बोगस सातबारा उतारे घेऊन विक्रीस आणले गेले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने तूर उत्पादक शेतकरी व्यापाऱ्याच्या गराळ्यात पार विसरविण्यात आला. पहिल्याच दिवशी आणल्या गेलेल्या तुरीपैकी काही शेतकरी कम व्यापाऱ्यांची तूर नाफेडच्या निकषाबाहेर गेल्यामुळे ते तूर रिजेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे नियमानुसार संबंधितांनी आपले तूर कृउबासच्या यार्डातून लगेच घेऊन जावयास पाहिजे होते. परंतु ‘त्या’ तुरीच्या मालकाचे आणि प्रादेशिक व्यवस्थापकाचे साटेलोटे असल्यामुळे ‘ती’ तूर आजही त्याच जागेवर पडून आहे. याव्यतिरिक्त जवळपास एक हजार पोती तूर आजही खरेदीच्या प्रतीक्षेत असून खरेदी मात्र पूर्णपणे बंद पडलेली आहे. अशात यार्डात पडलेले तुरीचे भविष्य काय, याबाबत शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकऱ्यांचा आरोप‘ती’ तूर नाफेडच्या पोत्यात मोजणी करून पडली आहे. पहिल्या दिवशी रिजेक्ट केलेली तूर नाफेडच्या पोत्यात ५० किलोप्रमाणे मोजणी करून ठेवली आहे. त्यामुळे वेळ मिळताच ‘त्या’ तुरीला अधिकृत करून खरेदी करण्याचा डाव अधिकारी रचत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.‘ती’ तूर रद्द केल्यावर संबंधितास तूर उचलून नेण्याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे. मात्र, त्याने उचल न केल्याने आमचा नाईलाज झाला आहे. - ए. व्ही.वसावे, उपप्रादेशिक व्यवस्थापक,आ. वि. महामंडळ