शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ छोटा चिखल्याची जिल्ह्यात नोंद

By admin | Updated: May 25, 2015 00:27 IST

पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यातील मालखेड व सिंभोरा तलावावर दुर्मिळ असा छोटा चिखल्या पक्षी आढळून आल्याने ...

पक्षी निरीक्षण : मालखेड, सिंभोरा तलावावर विहारअमरावती : पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यातील मालखेड व सिंभोरा तलावावर दुर्मिळ असा छोटा चिखल्या पक्षी आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड, प्रफुल्ल गावंडे आणि वन्यजीव अभ्यासक क्रिष्णा खान यांना पक्षी निरीक्षणादरम्यान अमरावती जिल्ह्यात प्रथमच छोटा चिखल्या पक्षी आढळून आला आहे. अमरावती जिल्हा पक्ष्यांच्या वैविध्याचे दर्शन घडविणारा असून अनेक पक्षी निरीक्षक पहाटेच छत्री तलाव, वडाळी तलाव, पोहरा तलाव, मालखेड तलाव येथे पक्षी निरीक्षणासाठी जातात. शहरातील मनोज बिंड, प्रफुल्ल गावंडे या पक्षी निरीक्षकांनी मालखेड तलाव व क्रिष्णा खान यांनी सिंभोरा तलावावर पक्षी निरीक्षण केले असता २३ मे रोजी चिखल्या पक्षी आढळून आला. यापूर्वी नागपूर येथे चिखल्या पक्ष्याची नोंद झालेली आहे. या पक्ष्याला इंग्रजी भाषेत ‘लेस्सर सँड प्लोवर’ तर शास्त्रीय भाषेत ‘काराड्रीअस मंगोलस’ म्हणून ओळख आहे. हा ‘क्यार्याड्रीडी’ या कुळातील असून तो लावा किंवा बटेर पक्ष्याच्या म्हणजे १९ ते २१ से.मी. आकाराचा असतो. पाणथळ जमीन तसेच समुद्र किनारपट्टीलगत हा पक्षी आढळून येतो. त्याच्या कपाळ आणि भुवयांचा रंग पांढुरका असून चोचीखालचा रंग पूर्णत: पांढरा व पोटाखालचा रंगही पांढरा आहे. चिखल्याचे पाय आणि चोचही काळ्या रंगाची आहे. खांद्याजवळील राखी-तपकिरी रंग ही या पक्ष्याची खास ओळख आहे. जिल्ह्यात चिखल्याची नोंद झाल्यामुळे वैभव दलाल, प्र.सु. हिरुरकर, सचिन थोते, राहुल गुप्ता, सुरेश खांडेकर, सचिन सरोदे, अमिताभ ओगले, शशी ठवळी, शुभम सायंके, धनंजय भांबुरकर वन्यजीव छायाचित्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे.पहिल्यांदाच चिखल्या पक्ष्याची नोंद जिल्ह्यातील तलावावर झाली आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक वातावरण पक्ष्यांसाठी समृद्ध असल्यामुळे पक्षी वैविध्य बघण्यास मिळत आहे. छायाचित्रकारांनी पक्ष्यांच्या नियमितपणे नोंदी घेतल्यास पुढील पिढीला माहिती देता येईल. तसेच संशोधन, संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही वन्यपे्रमीन्ाां कळेल. - यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक.