शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवाची १२ पासून रंगत

By admin | Updated: January 6, 2017 00:31 IST

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव आता चिखलदरा- मेळघाट पर्यटन महोत्सव यानावाने

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : देशभरातील पर्यटकांसाठी मनोरंजन, खवय्येगिरीवर भर नरेंद्र जावरे  चिखलदरा विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव आता चिखलदरा- मेळघाट पर्यटन महोत्सव यानावाने आठवडाभर साजरा करण्यात येणार असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या महोत्सवातून घडविले जाणार आहे. या पर्यटनमहोत्सवाचा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी आढावा घेतला. या महोत्सवामध्ये लावणी, आदिवासी नृत्य स्पर्धा, साहसी उपक्रमांसह विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना मिळेल. १२ ते १८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाची पहिली बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, प्रवीण येवतीकर, अरुण तायडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भावे, परिवहन विभागाचे मार्तंड नेवास्कर, राजेश मांगलेकर, वेदांत सुरपाटणे आदींची उपस्थिती होती. महोत्सवात सात दिवस मराठमोळी लावणी तर आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांकडून तीन बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सोबतच दरवर्षीप्रमाणे विविध पॉर्इंटवर साहसी उपक्रम व पुणे-मुंबई येथील लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवानी देखील या महोत्सवातून उपलब्ध करून दिली जाईल. पर्यटकांना रिझविण्यावर या महोत्सवांतर्गत अधिकाधिक भर दिला जाईल. त्यानुसार महोत्सवातील कार्यक्रमांची आखणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महोत्सवासाठी निधीची कमतरता नसून योग्य नियोजन करण्याचे सांगितले.