शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजीत धूळवड

By admin | Updated: March 8, 2015 00:10 IST

होळीची कर म्हणजे धूळवड. पोलिसांच्या कडक बंदोबस्तानंतरही जिल्ह्यात ही धूळवड रक्तरंजीत ठरली.

अमरावती : होळीची कर म्हणजे धूळवड. पोलिसांच्या कडक बंदोबस्तानंतरही जिल्ह्यात ही धूळवड रक्तरंजीत ठरली. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे धूळवडीच्या पूर्वसंध्येला म्हणजे ५ मार्च रोेजी सायंकाळी रखवालदार दाम्पत्याची विहिरीत फेकून हत्या करण्यात आली. अमरावती शहरातील माताखिडकी परिसरात करीच्या पार्टीच्या आयोजनावरून उद्भवलेल्या वादात सात-आठ जणांनी मिळून युवकाची निर्घृण हत्या केली. याशिवाय चिखलदरा तालुक्यातील पलस्या येथे रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरूवारी जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणात २ जण गंभीर जखमी झाले. रखवालदार दाम्प्त्याची हत्याबेलोरा : शेतातील गवत कापण्यास मनाई केल्याने उद््भवलेल्या वादात शेतातील रखवालदार दाम्पत्याला विहिरीत फेकून त्यांची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत धुळवडीच्या पूर्वसंध्येला ५ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. दुरखाशाह छगन धुर्वे (६५), प्रतिभा दुरखाशाह धुर्वे (५५ दोन्ही, रा. रेणुका खोक, जि. बैतुल, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.तर वासुदेव उईके, त्यांची पत्नी, संदीप उईके आणि त्याचा आणखी एक साथीदार (रा. पांढुर्णानजीक, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. शिरजगाव कसबा येथील शेतकरी रवी लाला यांच्या शेतात दुरखाशाह हे त्यांची पत्नी प्रतिभासह रखवालीचे काम करतात.विहिरीत फेकून दिलेबेलोरा : आरोपी वासुदेव उईके, त्यांची पत्नी व संदीप धुर्वे आणि त्याचा साथीदार रवी लाला यांच्या काकाच्या शेतात सोकारी करतात. रवी लाला व त्यांच्या काकाचे शेत शेजारी-शेजारीच आहे. काही दिवसांपासून आरोपी वासुदेव उईके त्यांच्या पत्नी व साथीदारांसह रवी लाला यांच्या शेतात येऊन गवत कापून नेत आणि बाजारात विकत. दुरखाशाह यांनी वारंवार विरोध करूनही हा प्रकार थांबत नव्हता. घटनेच्या दिवशी देखील आरोपी ऊईके यांनी रवी लाला यांच्या शेतात घुसून गवत कापून नेले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर वासुदेव उईके, त्यांची पत्नी, संदीप धुर्वे व त्यांच्या साथीदाराने धुर्वे दाम्पत्याला बेदम मारहाण करून शेतातील विहिरीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी शेतमालक रवी लालो शेतात आले असता त्यांना रखवालदार दाम्पत्य त्यांच्या झोपडीत आढळून आले नाही. शोध घेतला असता दोघांचेही प्रेत शेतातील विहिरीत तरंगताना आढळले. गवत कापण्याच्या वादाबद्दल धुर्वे दाम्पत्याने यापूर्वी शेतमालक रवी लाला यांना सांगितले असल्याने त्यांनी लगेच शेजारच्या झोपडीत जाऊन पाहिले. परंतु तेथे कोणीही आढळले नाही. त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह बलदेव दुरखाशाह धुर्वे यांच्या स्वाधिन करण्यात आले. बलदेवच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार चौगुले करीत आहेत. (वार्ताहर)वाद सोडविणाऱ्या युवकावर हल्लाअमरावती : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाला विट मारून जखमी करण्यात आल्याची घटना शुक्रवारी माताखिडकी परिसरात घडली. या प्रकरणी नितीन सज्जन तसरे (२३,रा. महाजनपुरा) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी गोपाल तायडे व बजरंग नावाच्या मुलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)‘कर’पार्टीच्या वादातून युवकाची निर्घृण हत्याअमरावती : होळीच्या करीसाठी पार्टीच्या तयारीवरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.०५ वाजता माताखिडकी चौकात घडली. विनोद नारायण बुंदेले (२८,रा.माताखिडकी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे रंगपंचमी उत्सवाला गालबोट लागले.विटांनी बेदम मारहाण अमरावती : या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून खोलापुरी गेट पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. स्थानिक माता खिडकीजवळील भुलेश्वर मंदिर परिसरातील रहिवासी संजय लक्ष्मण तंवर (४०) व मृत विनोद बुंदेले दोघे मित्र होते. शुक्रवारी संजयचा कर पार्टीच्या आयोेजनावरून अन्य सात-आठ युवकांसोबत वाद झाला. विनोद बुंदेले याने मध्यस्ती करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद गोपाल तायडे, सुनील तायडे, बजरंग अडायगे, संतोष डोईफोडे, सोनू उर्फ सूरज डोईफोडे, आकाश डोईफोडे आणि सतीश डोईफोडे यांनी विनोदला लाथा-बुक्क्यांनी व विटांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोदचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विनला पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोपाल प्रभाकर तायडे, बजरंग अडायगे, संतोष डोईफोडे, सोनू डोईफोडे, आकाश डोईफोडे व सतीश डोईफोडे या सहा आरोपींना शनिवारी पहाटे ५ वाजता अटक केली. मुख्य आरोपी सुनील प्रभाकर डोईफोडे व फारुख (हैदरपुरा) हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे व एसीपींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)