शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे केंद्रबिंदू

By admin | Updated: June 10, 2014 23:45 IST

शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये

आणखी तीन घरफोड्या : महावीरनगरात चोरट्यांचा हैदोस
अमरावती : शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका महिन्यात सर्वाधिक घरफोडीच्या घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. चोरीच्या आणखी तीन घटना सोमवार व मंगळवारच्या रात्री राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीरनगरात घडल्या. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ५३ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला.
मनोज मधुकर खोडे (४२), संगीता गजानन गचके (३२) व राजेश मनोहर रोंघे सर्व रा. महावीर नगर यांच्या घरी चोरीची घटना घडली.
मनोज खोडे यांच्या घरी संगिता गचके या भाडेकरु आहेत. खोडे व गचके कुटुंबातील सदस्य झोपले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मागील दरवाजातून प्रवेश केला. चोरट्यांनी खोडे यांच्या घरातील लोखंडी पेटीतून साडेतीन ग्रॅम सोन्याचे कानातले व रोख ४ हजार रूपये आणि गचके यांच्या घरातील लोखंडी कपाटातून ८ ग्रॅम सोन्याची चेन, साडेपाच ग्रॅम सोन्याचे कानातले व २५ हजार रूपये रोख असा एकूण ४९ हजार २५० रूपयाचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा खोडे यांच्या शेजारी राहणारे राजेश रोंघे यांच्या घरी वळविला. रोंघे हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी गेले आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथील लोखंडी कपाटातून दोन ग्रॅम सोन्याचे रिंग व दीड हजार रूपये रोख असा एकूण ४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या तिन्ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आल्या. ही माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.