शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून पाऊस ‘लेटकमर’

By admin | Updated: June 17, 2014 23:58 IST

निर्सगाच्या बदलत्या चक्राने मागील आठ वर्षा पासून जून महिन्यात पाऊस बळीराजाला हुलकावणी देत असून दरवर्षी लेटकमर म्हणून पावसाची नोंद होते़ परिणामी दरवेळी उशीरा पडणाऱ्या

धामणगाव रेल्वे : निर्सगाच्या बदलत्या चक्राने मागील आठ वर्षा पासून जून महिन्यात पाऊस बळीराजाला हुलकावणी देत असून दरवर्षी लेटकमर म्हणून पावसाची नोंद होते़ परिणामी दरवेळी उशीरा पडणाऱ्या पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट होते तर दरवेळी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजाचा फटका बसतो़
निर्सगाचे ऋुतूचक्र या संगणक युगात पूर्णत: बदलले आहे़ उन्हाळ्यात पाऊस तर पावसाळ्यात उन्हाचे चटके बसतात़ हिवाळ्यात पाऊस तर पावसाळ्यात थंडी अनुभवायला मिळते़ मानवाच्या या आधुनिक शोधचक्रात निर्सगाची पत्ते अद्यापही मानवाला मांडता आली नाही़ दरवेळी पावसाळ्यात वृक्ष लागवड होते़ परंतू वर्षभरात या वृक्षाची वाढ झालेली दिसत नाही़ विशेषत: लावलेल्या झाडापेक्षा कटाई केलेल्या झाडांची संख्या चार पटीने असते़ त्याचा परिणाम आता सर्वांनाच सोसावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे़ सन २००७ मध्ये मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हजेरी लावली नंतर बेपत्ता झाला तर शेवटच्या आठवड्यात दोन दिवस पाऊस पडला सन २००८ मध्ये मृग नक्षत्र कोरडा गेल्याची नोंद महसुल दप्तरी आहे़ सन २००९ मध्ये मृग नक्षत्राच्या पूर्वी रोहीनी बरसल्या पण मृगाचा लाल किडा या मृग नक्षत्रात पहायला मिळाला नाही़ हीच स्थिती सन २०१० मध्ये होती़ सन २०११ मध्ये पावसाने ठरलेल्या वेळी हजेरी लावली पण कमीअधीक पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची मोठी नासाडी झाली़ सन २०१२ मध्ये ठरलेल्या वेळी येणाऱ्या पावसाने जून च्या पहिल्या आठवड्यात हुलकावणी दिली़ सन २०१३ मध्ये पहिला व दुसरा आठवडा पाऊस पडला परंतू काही भागात हजेरी तर काही भागात गैरहजेरी अशी पावसाची नोंद झाली़ (तालुका प्रतिनिधी)