शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

तूर खरेदी : पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:19 PM

तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. व्यवस्थापक राजेंद्र गायकी, गौरव गोपाळ खाडे, नंदू राजेरामजी वाढोणकर, धीरज सुरेश गावंडे व अंकुश अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देटोकण क्रमांक फेरबदल : उपनिबंधकाची गाडगेनगर पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. व्यवस्थापक राजेंद्र गायकी, गौरव गोपाळ खाडे, नंदू राजेरामजी वाढोणकर, धीरज सुरेश गावंडे व अंकुश अशोक कदम अशी आरोपींची नावे आहेत.शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्रावर गैरप्रकार करणाºया अमरावती सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीचे कर्मचारी व व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. नाफेडमार्फत राज्यात हमी भावाने तूर खरेदी करण्यात येते. अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकºयांसाठी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राची जबाबदारी खरेदी-विक्री संघ सांभाळते. त्यासाठी संस्था सबएंजट म्हणून काम करते. त्यांनी १ फेब्रुवारी २०१८ पासून शेतकºयांची तूर खरेदी केली. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेप्रमाणे ही खरेदी करण्याचे बंधनकारक होते. मात्र, तूर खरेदी केंद्रावर टोकण क्रमाकांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. याबाबत जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी ४ मे रोजी चौकशी करून तो अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला. दरम्यान, कृष्णराव औगड, भोंडे व संजय लव्हाळे यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत झालेला चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या चौकशीत खरेदी-विक्री संघाने तूर खरेदीसाठी शेतकºयांची नावनोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली नसल्याचे निदर्शनास आले. एकापेक्षा अधिक नोंदवह्या उपयोगात आणल्या. मध्येच काही क्रमांक सोडून पुढचे देण्यात आले. एकच क्रमांक दोन वा अधिक शेतकºयांना देण्यात आला. खरेदी विक्री संघ व्यवस्थापकांनीही चुका झाल्याचे लेखी मान्य केले. कृष्णराव औगड व संजय लव्हाळे यांनी जानेवारीत नोंदणी केली असतानाही त्यांची तूर खरेदी झाली नाही. चौकशीनुसार टोकण क्रमाकांत अनियमितता व गैरप्रकार झाल्याचा अभिप्राय नोंदवून अमरावती सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीला जबाबदार धरून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे तूर खरेदीत गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उपनिबंधकांना दोषीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देशित केले.शासकीय तूर खरेदी केंद्रावरील टोकण क्रमांकात अनियमितता व गैरप्रकार झाल्याची तक्रार चौकशी अहवालासह प्राप्त झाली. त्या अनुषंगाने आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.