इर्विन रुग्णालयात कोरोना योद्धाना पीपीई किट प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:13 IST2021-04-16T04:13:20+5:302021-04-16T04:13:20+5:30

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीयर्स (बानाई )अमरावती शाखेच्यावतीने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि डॉ. ...

Provide Corona Warrior PPE Kit at Irvine Hospital | इर्विन रुग्णालयात कोरोना योद्धाना पीपीई किट प्रदान

इर्विन रुग्णालयात कोरोना योद्धाना पीपीई किट प्रदान

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीयर्स (बानाई )अमरावती शाखेच्यावतीने येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे १०० पीपीई किट्सचे दान करण्यात आले. कोरोना योद्धांना सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या अनुषंगाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स शाखा अमरावतीचे अध्यक्ष दिनेश खोंडे, उपाध्यक्ष अनिल सावदेकर, सचिव सुरेश दांडगे, सहसचिव अभियंता मीना मेश्राम आणि अभियंता मधुकर मेश्राम यांनी १०० पीपीई कीट्स सुपूर्द केल्या.

Web Title: Provide Corona Warrior PPE Kit at Irvine Hospital