शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

हजार घरकू ल निर्मितीसाठी २० कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: October 6, 2015 00:34 IST

शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना झोपडपट्टीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

महापालिकेचा पुढाकार : समाजकल्याण विभागाकडे अनुदानाची मागणीअमरावती : शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना झोपडपट्टीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सुमारे एक हजार घरकूल निर्मितीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी २० हजार कोटी रुपयांच्या अनुदान मागणीचा प्रस्ताव तयार करून तो समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत महानगरात २,२१३ घरकुलांची निर्मिती पूर्ण करण्यात आली आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील समूहांसाठी रमाई आवास योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पहिल्या टप्प्यात विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना घरकूल योजेनचा लाभ मिळाला. मात्र, ही सर्व कुटुंबे बीपीएल यादीत असणे अनिवार्य होते. त्यानुसार महानगरात सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली. सन- २०१०-११ पासून सुरू झालेल्या रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अमरावती महापालिका अग्रणी ठरली आहे. दरम्यान घरकूल योजनेचे अर्ज, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी महापालिका प्रशासनाने एजंसी नेमली होती. परंतु या एजसींच्या कामासंदर्भात लाभार्थी, नगरसेवकांच्या तक्रारी वाढताच आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आदर्श संस्था या एजसींला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर घरकूल निर्मितीचे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी आयुक्त गुडेवारांनी या विभागात १० अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच या विभागाचे प्रमुख रवींद्र पवार असून उपअभियंता हबंर्डे यांच्यासह येथे मोठा फौजफाटा नेमण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी सादर केलेल्या घरकुलांसाठी अर्जावर नेमलेले अभियंते प्रत्यक्ष जाऊन संबंधित घराची पाहणी करतात. त्यानंतर मूळ अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा करून घरकूल मंजुरीची प्रक्रिया सुरू होते. घरकूल अनुदान हे तीन टप्प्यांत मिळत असूृन पहिल्या टप्प्यात एक लाख, दुसऱ्या टप्प्यात ८० हजार तर तिसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये मिळते. रमाई योजनेतील घरकूल हे स्वत: लाभार्थ्यांना बांधून घ्यायचे आहे. महापालिका यंत्रणा केवळ एजंसी म्हणून कार्यरत आहे. आॅनलाईन प्रक्रिया, बायोमेट्रिक प्रणालीने रमाई घरकूल योजनेचे काम सुरू आहे. याला समाजकल्याणने मान्यता दिल्याची माहिती उपअभियंता हबंर्डे यांनी दिली.