शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:11 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे.

व्याघ्र प्रकल्प स्थापना दिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे. त्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे केले. येथील ‘कुलाढाप’मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी आदी उपस्थित होते.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणामार्फत पुरस्कार मिळाल्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चांगले काम करत असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वन संरक्षणासाठी चांगल्या दर्जाची शस्त्र घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी हत्ती उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ना. पोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘मेळव्याघ्र’ या नियतकालिका व संजीव गौड यांनी वन कायदा अधिनियमाचे मराठीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. डी. एस. डोंगरे, पी. सी. साठे, फगनसिंग उईके, एन. के. अलोने, व्ही. एल चव्हाण, एन. आर उगले, ए. एस. ऐवले, रत्नशील अंभोरे, जी. जे. चव्हाण, के. टी. बेडेकर, बी. आर. पवार, ए. एस. वानखडे, रिना पवार, एच. एस. कसदेकर आदींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)