शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची रणधुमाळी सुरु

By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ६७ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. आता १३५ उमेदवार मैदानात असून

चिन्हांचे वाटप : नेत्यांचे दौरे, सभांची धूम, सिलेब्रिटींचे रोड शोअमरावती : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ६७ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. आता १३५ उमेदवार मैदानात असून या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे.अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रीय व राज्य पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. गुरुवारपासून अपक्ष उमेदवारांची प्रचार मोहीम सुरु होईल. १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नेत्यांचे दौरे, सभा व सिलेब्रिटींचे रोड शो आदींचे नियोजन आखले आहे. दोन दिवसांपूर्वीच नितीन गडकरी, राज ठाकरे अमरावतीत येऊन गेलेत. गुरुवारी अजित पवार येत आहेत. दसरा आटोपताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या नेत्यांचे प्रचार दौरे राहणार आहेत.दोन दिवसांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सभा होणार आहेत. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी शरद पवार यांच्याही सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांची १२ आॅक्टोबर रोजी अमरावतीत जाहीर सभा आयोजित करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची प्रचारसभा व रोड शो होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आ. जोगेंद्र कवाडे यांच्याही सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रामदास आठवले हे प्रचार सभा घेतील. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, मनोहर जोशी, रामदास कदम यांच्याही सभा होतील. बसपच्या नेत्या मायावती, विलास गरुड तर भारिप- बमसंचे प्रकाश आंबेडकर यांच्यादेखील सभा येथे होणार आहेत. नेत्यांच्या सभांनी मैदान गाजविण्याची रणनीती आखताना राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहचण्यासाठी सिलेब्रिटींना आणण्याची तयारी चालविली आहे.