शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, उत्पादक शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:01 IST

शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे मागितली जात आहे. कोथिंबीर आणि पालकाची याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. मोठ्या श्रमाने उत्पादित केलेली कोथंबीर आणि पालक दोन ते तीन रुपये  गड्डीप्रमाणे मागितले जात आहे.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाला बाजारपेठेत यायला लागताच सर्वच भाजीपाल्यांचे दर शेतकऱ्यांकरिता गडगडले आहेत. राबराब राबून शेतात उत्पादित  केलेला भाजीपाला, उत्पादन खर्च तर सोडा तोडायला ही परवडत नाही. पालक, कोथंबीर शेतातच खराब होत आहे. अनेकांनी शेतातील वांगी, भेंडी, हिरव्या मिरचीची तोडाई बंद केली आहे. शेतातच वांगी, भेंडी, पालक कोथंबीरसह अन्य भाजीपाला सडत आहे. कवडीमोल भावात हा भाजीपाला व्यापारी दलाल मागत आहे. यात येणाऱ्या रकमेपेक्षा तोडाईचा खर्च शेतकऱ्याला चौपट लागत आहे.शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे मागितली जात आहे.कोथिंबीर आणि पालकाची याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. मोठ्या श्रमाने उत्पादित केलेली कोथंबीर आणि पालक दोन ते तीन रुपये  गड्डीप्रमाणे मागितले जात आहे. काही प्रसंगी ही कोथिंबीर आणि पालक कुणी घ्यायलाही तयार होत नसल्यामुळे शेतकऱ्याला ती सोडून जावे लागते. प्रसंगी ही कोथिंबीर, पालक  जनावरांना खायला टाकावी लागत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेनास्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला बाजारपेठेत विकताना त्याचे भाव अत्यल्प असते. २० किलो भेंडीचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जाते. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. कोथिंबीर, पालक, चवळी, दोडके यासह अन्य भाजीपाल्यांचीही तीच गत आहे.- सुनील कडू शेतकरी, जवळापूर

तोडाई, वाहतूक, कट्टे आणि बारदाना हा खर्च शेतकऱ्याला खिशातून खर्च करावा लागत आहे. जवळापूर, पथरोट परिसरात जवळपास पाचशे एकर हिरव्या वांगीची लागवड आहे. भाव गडगडल्यामुळे वांग्याची तोडाई बंद झाली. शेतकऱ्यांच्या शेतातच ही वांगी सडत आहेत.- आसिफ मोहम्मद, शेतकरी, पथ्रोट

मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात खरेदी नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी विकत घेत नाही. यातच बाहेरून येणारा भाजीपाला आहे. पावसामुळे गुणवत्ताही कमी-अधिक होते. यामुळे शेतकरी ते ग्राहक भावात फरक असतो.- दीपक चंदेल, व्यापारी अचलपूर

ग्राहकांना परवडेनाअत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणारे विक्रेते ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देत नाहीत. २० रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागते. ४० रुपये किलोच्या खाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.- संजय वानखडे, ग्राहक, कांडली

बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. आलू वगळता कुठलाही भाजीपाला २० रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. - विनोद इंगोले, ग्राहक, परतवाडा 

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी