शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात

By admin | Updated: May 9, 2014 01:41 IST

जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांऐवजी महापालिका..


अमरावती : जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांऐवजी महापालिका क्षेत्रातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार पालिका आयुक्तांना शासनाने बहाल केले आहे. मात्र अद्यापही शहरी भागातील शाळांवर नियंत्रण ठेवण्याचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकारी यांच्याच ताब्यात असल्याने या शाळांवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये आदी शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा शाळांचे हस्तांतरण शिक्षण विभागाने महानगर पालिकाकडे केले आहे.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही सोपस्काराची कारवाई पूर्ण झाली असताना यासोबतच शासनाने काढलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोडणार्‍या सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांकडे सोपविण्याचे स्पष्ट निर्देशही याच आदेशात देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या शहरातील शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत, त्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारांचे अधिकार पत्रच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेले नाही. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार शिक्षणाधिकारी यांनी स्वत:कडे राखून ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडे आधीची होती तेवढी जबाबदारी असल्याने कमी होणारा शिक्षण विभागाचा प्रशासकीय ताण कायम आहे. त्यामुळे अद्यापही शिक्षण विभागाची पूर्वीप्रमाणेच कामाची तारांबळ कायम आहे.
परिणामी शहरी भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिल्यास ग्रामीण भागातील शाळांवर योग्यरित्या नियंत्रण ठेवून शिक्षण विभागाला प्रशासकीय कामातील गती वाढविणे सोपे होऊ शकते; मात्र शिक्षणाधिकारी हे आपल्याकडील नियंत्रणाचा वाढलेला भार केव्हा कमी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत महापालिका क्षेत्रात येणार्‍या शाळा हस्तांतरणाची कार्यवाही केली आहे; मात्र यावर नियंत्रण ठेवण्याबाबत अद्याप तरी पत्र शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही.
- सविता चक्रपाणी, शिक्षणाधिकारी महापालिका, अमरावती