शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झालेल्या मोराला तिवशात जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:21 IST

तालुक्यातील वन शेतशिवारात विषबाधा झालेल्या एका राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला...

डॉक्टरांचे प्रयत्न : शेतकरी व वनरक्षकांची महत्त्वाची भूमिकातिवसा : तालुक्यातील वन शेतशिवारात विषबाधा झालेल्या एका राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला काही सतर्क सामाजिक कार्यकर्त्यांच्या व डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जीवदान मिळाले. रविवारी सकाळी माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना तिवस्यात घडली.विषबाधा होऊन वणी नजीकच्या एका शेतशिवारात एक नर जातीचा मोर तडफडत असल्याचे विनोद कडगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रॅक्टरचालक लुकेश अग्रवाल यांना सोबत घेऊन तिवसा पशुवैद्यकीय दवाखाना गठला. विषबाधा झालेल्या मोराला वाचविण्यात यश आल्याची तिवस्यात ही पहिलीच घटना असली तरी प्रत्येक नागरिकांचे प्राणिमात्रावर दया करणे हे आद्य कर्तव्य आहे.एकीकडे विषबाधा झालेला मोर मरणासन्न अवस्थेत तर दुसरीकडे ज्याठिकाणी मोराला उपचाराकरिता आणले तो पशुवैद्यकीय दवाखाना तर वनविभागाचे कार्यालयही बंद अशी परिस्थिती ऐन मोराला वाचविण्याचा धडपडीत निर्माण झाली होती. विषबाधा झालेल्या मोरासाठी जरी हा शासकीय सुटीचा दिवस असला तरी प्रामाणिकपणे निवासी राहून कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस प्राध्यानाने मोराचा जीव वाचविण्यासाीच होता आणि सुदैवाने असेच घडले. त्याचे प्राण वाचविण्यासाठी सारेच एकवटले. रविवार सुटीचा दिवस इतरत्र घालविण्याच्या बेतात असलेल्या डॉक्टर, वन कर्मचारी व इतर सर्व जणांना जेव्हा मोराचे प्राण वाचविण्याबाबतचा निरोप भेटला तेव्हा आहे त्याच ठिकाणाहून डॉक्टर, वनरक्षक वनविभागाचे कार्यालयात दाखल झाले. अन एकच धावपळ निर्माण झाली. तिवसा दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज आडे, खाजगी डॉ.संजय गोंडसे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन या मोराचे प्राण वाचविले.हे प्राण वाचविण्यासाठी प्रामुख्याने हेमंत निखाडे, ग्रमीण रुग्णालयाच्या डॉ.हर्षा अलोने, वनरक्षक गजानन चव्हाण, दिलीप शापामोहन, विजय रेवतकर, अशोक दाहाट, वनमजूर मोहन वनवे, वैकुंठ वनवे, नितीन गोहत्रे, आदीनी आपापले सर्व कामे ठप्प ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपून व मानवतेचा परिचय देत या मोराचे प्राण वाचविण्यासाठी धडपड केली. आवश्यक ते उपचार मोरापर्यत पोहचविण्यासाठी सर्वानी धावपळ केली. अखेर चार तासानंतर मोराच्या जीवात जीव आला व तो हालचाल करायला लागला, चालायला लागला, रविवरी दिवसभर हा मोर उपचारानंतर वनविभागाच्या स्वाधीन होता. (प्रतिनिधी)चार तासांनंतर वाचले मोराचे प्राणमोराचे प्राण वाचविण्यासाठी सुदैवाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आडे व डॉ.गोंडसे यांनी शर्थीचे उपचार केले. त्याला पाहिजे ते औषध व डॉक्टर उपलब्ध झाले. त्याला दर १५ मिनिटांनी ३ इंजेक्शन, २ सलाईनचा डोज पोहचल्यानंतर त्याचे विषमय शरीर धोक्याबाहेर पडले आणि मोर चार तासानंतर चक्क चालायला लागला.