शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

धारणी तालुक्यात माजी राज्यमंत्र्यांच्या गावाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

विकासकामांचे वाभाडे, पाणीपुरवठा, काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था धारणी : मेळघाटात ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांचे वाभाडे निघत आहेत. राज्याच्या ...

विकासकामांचे वाभाडे, पाणीपुरवठा, काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था

धारणी : मेळघाटात ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांचे वाभाडे निघत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावलेले रामू पटेल ऊर्फ भाऊसाहेब पटेल यांच्या गावालाही त्याची झळ पोहोचली आहे. त्यांच्या टेंभली या गावातील पाणीपुरवठा, काँक्रीट रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.

धारणी मुख्यालयापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावरील टेंबली हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री स्वर्गीय रामू म्हातांग ऊर्फ भाऊसाहेब पटेल यांचे हे पैतृक गाव . या गावातील सद्यस्थिती अत्यंत विदारक आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना अंतर्गत या गावात समशानभूमी शेडचे नुकतेच निर्माण करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी भाऊसाहेब पटेल यांचे निकटचे नातेवाईक आणि सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या आईचे मृत्यू झाले. स्मशानभूमीवर चार-पाच लोक लाकडे जमा करण्यासाठी चढले असता, शेडमधील सिमेंट ओटा खचल्यामुळे सर्व जण त्या खड्ड्यात पडले आणि जखमी झाले. त्याबाबत युवक काँग्रेसचे वीरेंद्र पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, ठक्कर बाप्पा योजनेचे नियोजन व आर्थिक पुरवठा प्रकल्प अधिकारी कार्यालयतून केले जाते. याच कार्यालयात कार्यरत सहायक प्रकल्प अधिकारी यांच्याबाबत हा प्रकार घडला . त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

गावातील पाणीपुरवठा योजना बंद असल्याने टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ आली आहे. योजनेची मोटार जळाल्याची घटना वारंवार घडत आहे. यामागील षडयंत्र समोर आणण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर योजनेंतर्गत काँक्रीट रस्ते आणि नालीची निर्मिती करण्यात आली. ते बांधकाम निकृष्ट आणि जागा अयोग्य असल्याने सांडपाणी गावातील रस्त्यांवरून वाहत आहे. या गावातील विविध विकास योजनांची स्वतंत्र चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-