शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा व्हिडिओ कांड : 'मुलींना जाळ्यात कसे ओढायचे हे मी गुरूकडून शिकलो' अयानने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:32 IST

Amravati : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अयान अहमद नावाच्या नराधमाचा खरा चेहरा आता समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अयान अहमद नावाच्या नराधमाचा खरा चेहरा आता समोर आला आहे. त्याच्यासह अन्य अटक आरोपींकडून १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ फोटोग्राफ्स पोलिसांनी जप्त केले असले तरी या नराधमाला आपल्या कृत्याची साधी 'खंत'देखील नसल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे अयान एसआयटी समोर वागत असून, त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाऐवजी निर्लज्जपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.

सहा दिवसांपासून एसआयटीची चमू नराधम अयानची कसून चौकशी करत आहेत. मात्र, या चौकशीत त्याने दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. मुलींशी संवाद कसा साधायचा आणि त्यांना जाळ्यात कसे ओढायचे, हे मी एका विशिष्ट गुरूकडून शिकलो, अशी कबुली त्याने दिली आहे. 

साथीदारांचेही फुटले बिंग

या गुन्ह्यात अयानला साथ देणारा मानव सुगंधे आणि अयानचे व्हिडीओ चोरणारा उजेर खान यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी त्यांची 'खाकी' स्टाइलने उलटतपासणी केली. तासाभरासाठी भाड्याने फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधेच्या मदतीने अयानने हे पाशवी कृत्य केले. पोलिसांनी आतापर्यंत मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त केली असून, तांत्रिक पुराव्यांचे जाळे अयानभोवती घट्ट विणले आहे.

'तो मी नव्हेच' चा अयानचा सूर, पिडिताने काढली हवा

विशेष म्हणजे, केवळ आठ मुलीच नव्हे तर अनेक मुली आपल्या संपर्कात होत्या आणि अमरावतीतील कठोरा नाक्यावरील फ्लॅटमध्ये जे घडले ते 'संमतीने' होते, असा दावा करून तो स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मात्र, एक १५ वर्षीय मुलगी जबाबासाठी समोर आल्याने त्याच्या दाव्यातील हवा निघाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी स्ट्रॉग 'से' दाखल केल्याने आरोपी अयान अहमद याला न्यायालयाने तब्बल सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आता पिडिताच्या बयानावर अयानचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.

असे आहे एसआयटीचे निरीक्षण

इतका मोठा गुन्हा करूनही त्याच्या डोळ्यांत साधी शरम नाही. उलट तो अतिशय शांतपणे पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे. ही एक विकृत मानसिकता असून, अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच ही केस अधिक स्ट्राँग कशी होईल, याकडे एसआयटीने लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरात प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, आता कायद्याचा बडगा या नराधमावर कसा पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अमरावतीकरांचे लक्ष न्यायालयाकडे

मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी अयानची पोलिस कोठडी संपत आहे. या काळात त्याच्यावर आणखी नवीन गुन्हा दाखल होणार का, की मूळ गुन्ह्यातच कलमांची वाढ होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोशल मीडिया ब्लॉगर म्हणून मिरवणाऱ्या या तरुणाला मुलींना जाळ्यात ओढण्याची जणू 'लत' लागली होती. मुलींशी शारीरिक जवळीक साधत असताना तो स्वतःच हाती मोबाइल घेऊन वा सेल्फी मोडवर स्वतःच व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत होता, असेदेखील तपासादरम्यान उघड झाले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Paratwada Video Scandal: Accused Admits Learning Entrapment Tactics from a 'Guru'

Web Summary : Ayan Ahmed, accused of exploiting girls, confessed to learning manipulation tactics. Police seized explicit content; Ayan shows no remorse. He claims encounters were consensual, but a minor's statement refutes this. Investigation continues, focusing on securing a strong conviction. Court proceedings are closely watched.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र