शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी झुगारले बदल्यांचे आदेश

By admin | Updated: September 13, 2014 23:34 IST

प्रशासनात सुधारणा होऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना बढती मिळावी या उद्देशाने दिलेल्या बदल्यांचे आदेश अचलपूर नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी धुडकावून लावले आहेत.

सुनील देशपांडे - अचलपूरप्रशासनात सुधारणा होऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना बढती मिळावी या उद्देशाने दिलेल्या बदल्यांचे आदेश अचलपूर नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी धुडकावून लावले आहेत. बदल्या झाल्यानंतर बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याची मुदतीची तारीख संपल्यानंतरही बहुतांशी शिक्षक तथा मुख्याध्यापक रुजू होण्यास तयार नाहीत. आपली बदली रद्द करण्यासाठी ते राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. अचलपूर नगरपरिषदेंतर्गत अचलपूर-परतवाडा शहर मिळून हिंदी, मराठी, उर्दू माध्यमांच्या एकूण २६ शाळा आहेत. त्यामध्ये कार्यरत काही शिक्षक व मुख्याध्यापक १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही एकाच शाळेत आहेत. त्यामुळे काही शाळांमधील शिक्षकांची मुख्याध्यापकपदाची बढती रोखली गेली तर कुणाच्या सेवाज्येष्ठतेला लगाम लागला. राजकीय दबावामुळे त्यांची बदली करण्याचे धाडस कोणत्याच अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दाखविले नाही, अशी चर्चा आहे. जुन्या शहरातील मुख्याध्यापक व शिक्षकांची माहिती घेऊन नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. नगरसेवकांच्या सहमतीने ते निर्गमित करण्यात आले. बदली झालेले काही शिक्षक, मुख्याध्यापक पद नको म्हणून बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यास तयार नाही. काही जण मुख्याध्यापकपद जाईल म्हणून बदलीच्या जागेवर जाण्यासाठी नकारघंटा वाजवीत आहेत. काही शिक्षक आपली गैरसोय होईल म्हणून जाण्यास तयार नाहीत. दरम्यान काही शिक्षक व मुख्याध्यापकांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. अजूनही बहुतांशी शिक्षक आपली शाळा सोडण्यास तयार नसल्याने ९ शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदाच्या बढत्या रखडल्या आहेत. अचलपूर-परतवाडा शाळेतील अंतराचा विचार केल्यास १ ते २ किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेच्या शाळा आहेत. शाळा शहरातच असल्यावरही सदर बदली झालेले शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक शाळा सोडून जाण्यास तयार नाहीत. त्यांच्या बदलीच्या आदेशात ३० आॅगस्ट ही शेवटची तारीख त्यांना देण्यात आली होती. ही तारीख उलटून १० ते १२ दिवस झाल्यावरही काही शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक पदासाठी स्थानांतरित झालेल्या शाळेत यायला तयार नाहीत. त्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर सुरू आहे. काही जणांना नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईच्या नोटिशी बजावल्या आहेत.