दंडात्मक कारवाई वाढविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:02+5:302021-03-04T04:23:02+5:30

अंजनगाव सुर्जी : मास्क न घालणाऱ्या व बेशिस्तपणे वागणाऱ्या नागरिकांवर तालुक्यातील शासकीय यंत्रणांनी लक्ष ठेवून शहर व ग्रामीन भागात ...

Order to increase punitive action | दंडात्मक कारवाई वाढविण्याचे आदेश

दंडात्मक कारवाई वाढविण्याचे आदेश

अंजनगाव सुर्जी : मास्क न घालणाऱ्या व बेशिस्तपणे वागणाऱ्या नागरिकांवर तालुक्यातील शासकीय यंत्रणांनी लक्ष ठेवून शहर व ग्रामीन भागात दंडात्मक कारवाया वाढवाव्यात, असे आदेश दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर दिले आहेत.

अंजनगाव सुर्जी शहरात तथा ग्रामीण भागात लग्न समारंभांवर त्या-त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी लक्ष ठेवून कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई, तापाची व इतर लक्षणे असलेल्या रुग्णांची खासगी डाॅक्टरांकडून यादी, स्थानिक स्तरावर तहसील कार्यालयात उपलब्ध काँल सेंटरच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुख्यालयी कर्मचारी हजर नसल्यास तो ग्रामसेवक असो वा तलाठी, त्यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती तहसील प्रशासनास देण्यात यावी, असे आवाहन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Order to increase punitive action