शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटला, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:09 IST

नजीकच्या धारणमहू व उकूपाटी गावाच्या मध्यभागी महादेव नाल्यात ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून मामा व भाच्याचा जागीच मृत्यू झाला.

उकुपाटी येथील घटना : मृतांमध्ये मामा-भाच्याचा समावेश धारणी : नजीकच्या धारणमहू व उकूपाटी गावाच्या मध्यभागी महादेव नाल्यात ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून मामा व भाच्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री २ वाजता घडली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. मामा-भाचे भाड्याने घेतलेले शेत नांगरत असताना ही घटना घडली. ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ट्रॅक्टरखाली दबल्याने दोघांना चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सचिन भुरेलाल सेमलकर (१९, रा.चाकर्दा) व रमेश सोमा धांडे (४५, रा.उकूपाटी) अशी मृतांची नावे आहे. ट्रॅक्टर मालक सचिन सेमलकर हा रमेश धांडे यांच्यासमवेत रात्री २ वाजता रमेश यांनी घेतलेले भाड्याचे शेत नांगरण्याचे काम करीत होता. हे शेत राणामालूर येथील शेतकऱ्याचे आहे. याशेताच्या अगदी धुऱ्यावर नाला असून हा नाला १० फूट खोल आहे. धुऱ्यावर ट्रॅक्टर रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न करीत असताना हा अपघात घडला. पहाटे परिसरातील लोकांना हा अपघात दिसून आला. घटनेची माहिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील धारणमहू, उकूपाटी, दिया आदी गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ट्रॅक्टरखाली दबलेले दोन्ही मृतदेह नागरिकांनी महत्प्रयासाने बाहेर काढले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धारणीचे ठाणेदार गवई यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल केले. यावेळी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह कालू मालवीय, अनिल मालवीय, प्रमोद खरपे, विष्णू पटोरकर उपस्थित होते. घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ट्रॅक्टरच्या दुर्देवी अपघातात मामा-भाचाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. रात्री हा अपघात घडल्याने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळू शकली नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)