शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये नोकर भरतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 20, 2014 23:16 IST

जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे.

शासनाचे आदेश : नोव्हेंबरमध्ये होणार प्रकिया अमरावती : जिल्हा परिषदेतील विविध रिक्त पदांची भरती प्रकियेचा राज्य शासनाने अडसर दूर केला आहे. मात्र हा निर्णय घेताना शासनाने भरती प्रकियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त काढला आहे.राज्य शासनाने काही महिन्यापूर्वीच शासकीय नोकर भरतीवर स्थगिती दिली होती. परिणामी यंदा जून, जुलै महिन्यात होणारी जिल्हा परिषदेची नोकर भरती लोकसभा निवडणुकीमुळे अडचणीत सापडली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येत नाही तर काही दिवसांत पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली. २४ जून रोजी ही आचारसंहिता संपली. हा प्रकार थांबताच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांकडून आरक्षणनिहाय नोकर भरतीबाबत रिक्त जागांची माहिती शासन स्तरावरून मागविण्यात आली. ही माहिती पोहचताच शासनाने ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ेनोकर भरती प्रकियेवरील स्थगिती उठवून जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी वर्तमान पत्रात प्रसिध्दीचे आदेश दिले आहेत. याशिवाय नोकर भरतीसाठी उमेदवारांकडून अर्जही स्वीकारावे. परंतु भरती प्रकियेसंबंधी लेखी परीक्षा विधानसभा निवडणुकीनंतर घेण्याच्याही सूचना या शासन निर्णयात देण्यात आहेत. या निर्णयामुळे मागील दोन महिन्यांपासून रखडलेल्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)