निवडणुकीतही कांद्याने खाल्ला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 06:00 AM2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:44+5:30

हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजी मंडईतून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मात्र दामदुप्पट दरात विक्री करतात. परिणामी किमान शंभर टक्के नफा कमाविण्याचा गोरखधंदाच व्यापामुद्यांकडे दुर्लक्ष : किरकोळ बाजारात ७० रुपये किलोनी सुरू केला आहे. ही एकप्रकारे ग्राहकांची लूटच असल्याची भावना काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

Onion too high in election! | निवडणुकीतही कांद्याने खाल्ला भाव !

निवडणुकीतही कांद्याने खाल्ला भाव !

Next
ठळक मुद्देमुद्यांकडे दुर्लक्ष : किरकोळ बाजारात ७० रुपये किलो

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणुकीत कांद्याचे भाव कमी होतील, असे अपेक्षित होते. पण, कांद्याचे दर या दिवसांतही तेजीत राहिल्याने कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याची चर्चा झडत आहे.
किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विक्री करण्यात येत आहे. मात्र, येथील भाजी मंडईत सोलापूर व कर्नाटकातून येणाऱ्या नवीन पांढºया कांद्याला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये भाव मिळाला. हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजी मंडईतून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना मात्र दामदुप्पट दरात विक्री करतात. परिणामी किमान शंभर टक्के नफा कमाविण्याचा गोरखधंदाच व्यापामुद्यांकडे दुर्लक्ष : किरकोळ बाजारात ७० रुपये किलोनी सुरू केला आहे. ही एकप्रकारे ग्राहकांची लूटच असल्याची भावना काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. लाल कांद्याला दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल, तर पांढरा कांदा तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटलने ठोक दरात निक्री होत आहे. पांढरा कांदा सोलापूर व कर्नाटक राज्यातून येत आहे. जेथे कांद्याचे घेतले जातात येथे परतीच्या पावसाने कांद्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरनंतर कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता येथील व्यापारी सतीश कावरे यांनी वर्तविली आहे. पांढºया कांद्याची ३०० क्विंटल, तर लाल कांद्याची ४०० ते ५०० क्विंटलची आवक होत आहे.

सोलापूर व कर्नाटकमधून नवीन कांद्याची आवक होत आहे. परतीच्या पावसाने ज्या ठिकाणी कांद्याचे पीक घेतले जात आहे, त्या ठिकाणी नुकसान होत असल्याने पुन्हा महिनाभरात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
-सतीश कावरे
कांदा व्यापारी, अमरावती

Web Title: Onion too high in election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा