देशी दारूची वाहतूक करताना कारसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:00+5:302021-03-04T04:23:00+5:30

जरूड : येथे एका कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांना देशी दारूच्या २०० बाटल्या आढळून आल्या. यावरून कार ...

One arrested with car while transporting native liquor | देशी दारूची वाहतूक करताना कारसह एकाला अटक

देशी दारूची वाहतूक करताना कारसह एकाला अटक

जरूड : येथे एका कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांना देशी दारूच्या २०० बाटल्या आढळून आल्या. यावरून कार आणि मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रानुसार, जरूड येथील स्टेट बँकेसमोरून कार क्र. एमएच २७ एच ९७५९ मधून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एएसआय दीपक जाधव यांना मिळाली. २८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता दरम्यान सदर कारची झडती घेतली असता त्यात बॉबी कंपनीच्या देशी दारू १८० मिलीच्या २०० बॉटल आढळून आल्या. सदर दारू अवैध विक्रीकरिता जात होती. यात आरोपी मेहुल बंशीलाल उईके (२२, रा. शहापूर) विरुद्ध कलम ६५ (ड) मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून अटक केली. ६ हजार रुपये किमतीच्या दारूसह कार एक लाख ५० हजार रुपये असे एकूण एक लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय दीपक जाधव करीत आहेत.

Web Title: One arrested with car while transporting native liquor