पीएचसीत अधिकारी-कर्मचारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:01:02+5:30

झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांना कापूसतळणी आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटी दरम्यान आरोग्य अधिकारी तुषार सोळंके यांचा रजेचा अर्ज दिसला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. दुसरे आरोग्य अधिकारी जुनिद अयर, आरोग्य सहायक एस.जी.पवार, अ‍े.आर. पाटील, आरोग्य सेवक बी.आर.होरे, कंत्राटी एएनएम प्रियंका रूटींग, वाहनचालक अक्षय काळपांडे आदी गैरहजर होते.

Officer-in-staff disappeared at PHC | पीएचसीत अधिकारी-कर्मचारी गायब

पीएचसीत अधिकारी-कर्मचारी गायब

Next
ठळक मुद्देअध्यक्षांच्या भेटीत प्रकार उघड : सर्वांच्या वेतन कपातीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : झेडपी अध्यक्षांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजता अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी आणि भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (पीएचसी) सकाळी ९.४० वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान दोन्ही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ते परिचर असे २० जण गैरहजर आढळले. या सर्व गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना पत्राव्दारे दिले आहेत.
झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांना कापूसतळणी आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटी दरम्यान आरोग्य अधिकारी तुषार सोळंके यांचा रजेचा अर्ज दिसला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. दुसरे आरोग्य अधिकारी जुनिद अयर, आरोग्य सहायक एस.जी.पवार, अ‍े.आर. पाटील, आरोग्य सेवक बी.आर.होरे, कंत्राटी एएनएम प्रियंका रूटींग, वाहनचालक अक्षय काळपांडे आदी गैरहजर होते. परिचर अब्दुल हमीद यांची २७ व २८ फेब्रुवारीची हजेरी रजिस्टवर स्वाक्षरी नव्हती, परिचर आर.बी.पडघामोड, बेबी महाजन, छाया देशमुख गैरहजर होते. आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी शुभम सोळंके २७ व २८, तेजस्विनी खंडारे या २० ते २८ फेब्रुवारीपर्यंत गैहजर होत्या. आर.जे लादे, एस.एस.खेडीकर, स्वप्नील उपासे, जी.डब्ल्यू मावळे, ममता व्यवहारे, एस.एस. बांबोळे, सतीश मेश्राम आदी कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांची वेतन कपात, स्वच्छता, शासकीय गणवेश, दौरा रजिस्टर अपडेट देऊन मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्याचे निर्देश डीएचओंना दिले आहेत.

Web Title: Officer-in-staff disappeared at PHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.